Uddhav Thackeray interacting with voters during his Mumbai BMC election campaign, urging citizens to vote for the Mashal symbol to protect Marathi identity and democracy.
Uddhav Thackeray Sarkarama

BMC Election : 'निवडून दिलेले गद्दार निघतात; मात्र, निवडून देणारे कधीही गद्दार नसतात...'; प्रचाराच्या शेवटच्या क्षणी ठाकरेंचं मतदारांना भावनिक आवाहन

Mumbai BMC Election 2026 : "आम्ही केलेल्या कामांच्या जोरावर मते मागतोय, तुम्हीही कामे केली असतील तर ती दाखवा आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरा. पण दाखवण्यासारखे त्यांनी काही केलेले नाही. मात्र, त्यांच्याकडे वाटण्यासाठी भरपूर आहे. आता पैसे वाटतानाही त्यांना पराभवाची भीती वाटतेय. आपण निवडणूक नाही, तर गद्दार आणि भ्रष्टाचाराच्या वृत्तीविरोधात लढतो."
Published on

Mumbai News, 14 Jan : "आपण निवडणूक नव्हे तर गद्दार आणि भ्रष्टाचाराच्या वृत्तीविरोधात लढतोय. आपली मराठी अस्मिता मारण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्या भाषेवर आक्रमण होत आहे. ही गद्दारी आणि महाष्ट्रद्रोही वृत्ती असून या वृत्तीचा पराभव करण्यासाठी मशालीला मत द्यावे लागेल. निवडून दिलेले गद्दार निघतात.

मात्र, निवडून देणारे कधीही गद्दार नाहीत, हे दाखवणारी ही निवडणूक आहे," असं भावनिक आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि मतदारांना केलं आहे. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. अगदी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देखील ठाकरेंनी शाखांना भेटी दिल्या.

यावेळी मुंबई विमानतळ येथील शाखा भेटी दरम्यान त्यांनी मतदारांशी संवाद साधताना मशालीला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, "सध्या पैशांचा धुमाकूळ सुरू असून निवडणुकीच्या निमित्ताने दोन दिवस पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरु राहणार आहे. त्यामुळे पैसे वाटणारं कोणी दिसल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या.

Uddhav Thackeray interacting with voters during his Mumbai BMC election campaign, urging citizens to vote for the Mashal symbol to protect Marathi identity and democracy.
Junnar Nagar Parishad : बहुमत नसूनही राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी गेम फिरवला; ठाकरेंचा एकमेव नगरसेवक उपनगराध्यक्षपदी: शिंदेंच्या आमदाराला होमग्राऊंडवरच मोठा धक्का

पण त्या पैशांसाठी स्वतःचे आयुष्य विकू नका. कर्तव्याला चुकू नका, मुंबई आपली आहे, ती आपल्याचा ताब्यात ठेवा." तर यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. "आम्ही केलेल्या कामांच्या जोरावर मते मागतोय, तुम्हीही कामे केली असतील तर ती दाखवा आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरा. पण दाखवण्यासारखे त्यांनी काही केलेले नाही. मात्र, त्यांच्याकडे वाटण्यासाठी भरपूर आहे.

Uddhav Thackeray interacting with voters during his Mumbai BMC election campaign, urging citizens to vote for the Mashal symbol to protect Marathi identity and democracy.
Shivsena Vs BJP : भाजप-शिंदेंच्या शिवसेनेत तुफान राडा, चार जखमी; उमेदवाराच्या अटकेनंतर वातावरण तापले; रुग्णालयात गोंधळ

आता पैसे वाटतानाही त्यांना पराभवाची भीती वाटतेय. आपण निवडणूक नाही, तर गद्दार आणि भ्रष्टाचाराच्या वृत्तीविरोधात लढतो. छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या दैवतांचे पुतळे आज झाकले जातायत. आपल्या भाषेवर आक्रमण होत आहे. ही गद्दारी आणि महाष्ट्रद्रोही वृत्ती आहे. या वृत्तीचा पराभव करण्यासाठी मशालीला मत द्यावे लागेल. निवडून दिलेले गद्दार निघतात, मात्र, निवडून देणारे कधीही गद्दार नाहीत, हे दाखवणारी ही निवडणूक आहे," असं ठाकरे यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com