Kolhapur Municipal Elections 2025 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कोल्हापुरात इंडिया आघाडीत फूट; 'आप' बाहेर पडणार तर ठाकरेंच्या शिवसेनाही निर्णय आज होणार

Kolhapur INDIA Alliance : गेल्या दहा वर्षांपासून कोल्हापुरात आम आदमी पक्ष विविध मुद्द्यांवरून आणि प्रश्नावरून आक्रमक होत आला आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा मुद्द्यांवरून आम आदमीने महापालिकेला घेराव आंदोलन करत आवाज उठवला आहे. पक्षाचे कार्यकर्त्यांची फळी तयार होत असताना या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उतरावे असं आवाहन करण्यात आले होते.

Rahul Gadkar

Kolhapur News, 23 Dec : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आजपासून धुरळा उडणार आहे. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याने सर्वच राजकीय पक्षात अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. उमेदवार पळवा पळवी पासून ते मातब्बरांना आपल्याकडे खेचण्यासाठी विशिष्ट यंत्रणा कामाला लागली आहे.

अशातच जागा वाटपा संदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. कोल्हापुरात महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी ही एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता असताना आता कोल्हापूर महापालिकेत इंडिया आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. या आघाडीतून आम आदमी पक्ष हा बाहेर पडून स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. आज त्या संदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आहे.

गेल्या दहा वर्षांपासून कोल्हापुरात आम आदमी पक्ष विविध मुद्द्यांवरून आणि प्रश्नावरून आक्रमक होत आला आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा या मुद्द्यांवरून आम आदमी पक्षाने महापालिकेला घेराव आंदोलन करत आवाज उठवला आहे. पक्षाचे कार्यकर्त्यांची फळी तयार होत असताना या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उतरावे असं आवाहन करण्यात आले होते.

त्यानुसार इंडिया आघाडीतून लढवण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख संदीप देसाई यांनी घेतला होता. मात्र या इंडिया आघाडीच्या बैठकीत समानधारक जागा मिळत नसल्याची खंत आम आदमीच्या कार्यकर्त्यांची आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत इंडिया आघाडीत फूट पडली असून आम आदमी पक्षाकडून स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा विचार केला जात आहे. या आघाडीत समानधारक जागा मिळत नसल्याने एकला चलोचा नारा दिला जाण्याची शक्यता आहे.

आज आम आदमीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संदीप देसाई पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात घोषणा करणार आहेत. इंडिया आघाडीत आम आदमी पक्षाला एक- दोन जागेवर बोळवण होत असल्याची माहिती समोर येत आहे. कार्यकर्त्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ न देण्यासाठी स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीचा निर्णय आज होणार

तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरे सेना मध्ये जागा वाटपाचं सूत्र जवळपास निश्चित झाल्याचे समजते. मात्र ज्या जागा ठाकरे सेनेला मिळाले आहेत त्यावरून ठाकरे सेना आणखीन दोन जागांची मागणी करत आहे.

मात्र काँग्रेसकडून आणखीन दोन जागा सोडण्याचा प्रस्तावावर विचार होत नाही असे दिसते. त्यावर आज ठाकरे सेनेची आज महत्त्वपूर्ण बैठक आहे. संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून आज चर्चा होणार आहे. चर्चेनंतर ठाकरे सेनेचाही एकत्र की स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT