Bandu Andekar : 'न्याय देता येत नसेल तर अन्याय तरी करू नका; आंदेकर कुटुंबियांना तिकीट दिल्यास आत्मदहन करणार...', आयुष कोमकरच्या आईचा इशारा

Andekar Family in Pune Municipal Election : सध्या वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेले गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची ५ सप्टेंबर रोजी नाना पेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांच्यासह एकूण 15 जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
Bandu Andekar Ayush Komkar murder case
Bandu Andekar, Ayush Komkar murder Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 23 Dec : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील दोन महिलांना आगामी पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंडू आंदेकर यांच्यासह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर या तिघांना निवडणूक रिंगणात उतरण्यास न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आंदेकर कुटुंबातील दोन सदस्य निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेले गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची ५ सप्टेंबर रोजी नाना पेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांच्यासह एकूण 15 जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तरीही या तिघांना निवडणूक लढवता येणार असल्याचा आता स्पष्ट झाला आहे. मात्र आंदेकर कुटुंब हे पूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी निगडीत राहिलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आंदेकर कुटुंबाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार की ते अपक्ष लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.

Bandu Andekar Ayush Komkar murder case
Vinay Kore Politics: विनय कोरेंच्या कारभाऱ्यांना पाणी पाजलं, पेठ वडगावात 'जनसुराज्य'ला तोंडावर आपटलं

मात्र आंदेकर कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस देखील सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता आंदेकर टोळीने हत्या केलेल्या आयुष कोमकर यांच्या आईने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे.

Bandu Andekar Ayush Komkar murder case
Devendra Fadnavis : 'तेव्हा आमची महायुती...', नगरपालिकांच्या निकालानंतर फडणवीसांचा कॉन्फिडन्स वाढला, थेट 5 वर्षांनी होणाऱ्या विधानसभेची रणनीती सांगितली

यामध्ये संजीवनी कोमकर म्हणाल्या, सर्व पक्ष नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे जर आम्हाला न्याय देता येत नसेल तर आमच्यावरती अन्याय तर करू नका. अंधेकरांना निवडणुकीचे तिकीट देऊ नका. माझ्या लहान मुलाचं त्यांनी आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे.

सत्तेची पावर त्यांच्याकडे आहे म्हणूनच ते या थराला पोहोचले आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे की आंदेकर कुटुंबातील कोणालाही तिकीट देऊ नका आणि कोणत्याही पक्षाने त्यांना तिकीट दिल्यास मी त्यांच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com