Devendra Fadnavis : 'तेव्हा आमची महायुती...', नगरपालिकांच्या निकालानंतर फडणवीसांचा कॉन्फिडन्स वाढला, थेट 5 वर्षांनी होणाऱ्या विधानसभेची रणनीती सांगितली

Devendra Fadnavis Statement on Mahayuti : महायुतीच्या यशाची चर्चा जोरदार सुरू असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही महायुती करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Mahayuti Municipal Election Victory 2025
Mahayuti Municipal Election Victory 2025Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 23 Dec : राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झालेत. या निकालात भाजप आणि महायुतीला भरघोस यश मिळालं आहे. महायुतीने तब्ल २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता महायुतीची ताकद वाढल्याचं स्पष्ट झालं आहे.

महायुतीच्या यशाची चर्चा जोरदार सुरू असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही महायुती करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपला मोर्चा महापालिका निवडणुकांकडे वळवळा आहे.

याच निवडणुकीसाठी आता अजित पवार आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित येतील असा दावा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते दत्ता धनकवडे यांनी केला आहे.

Mahayuti Municipal Election Victory 2025
Jayant Patil News: लावा ताकद... इथला सिकंदर मीच! जयंत पाटलांनी भाजपचा टप्प्यात आणून कसा कार्यक्रम केला? वाचा सविस्तर

तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, मी ऐकीव गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही. मात्र, आमचं एक तत्व पक्कं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या परिस्थितीनुसार लढले जातात.

राज्यात आमची महायुती आहे. ही महायुती कायम राहणार आहे. शिवाय पाच वर्षांनी जेव्हा आम्ही विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ तेव्हाही आमची महायुती तुम्हाला पाहायला मिळेल, असं यावेळी फडणवीस म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता २०२९ ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला देखील भाजप महायुतीमधून लढणार असल्याचे संकेत फडणवीसांनी दिले.

Mahayuti Municipal Election Victory 2025
Vinay Kore Politics: विनय कोरेंच्या कारभाऱ्यांना पाणी पाजलं, पेठ वडगावात 'जनसुराज्य'ला तोंडावर आपटलं

मात्र, दुसरीकडे भाजप २०२९ ची विधानसभा स्वबळावर लढणार असल्याचंही बोललं जातं. यासाठी भाजपने आताच शिंदेंच्या नेत्यांची ताकद कमी करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा धडाका लावला आहे. असं असताना आता फडणवीसांनी आपण पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत देखील महायुती म्हणून सामोरं जाणार असल्याचं वक्तव्य केल्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com