Congress MLA Satej Patil addresses party workers in Kolhapur, warning of strict action if candidates fail to campaign collectively in the four-member ward municipal election system. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : एक निवडून आला आणि तिघे पडले, तर विजयी नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार, सतेज पाटलांची कार्यकर्त्यांना तंबी

Congress Kolhapur news : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत चार सदस्य पद्धतीत एकटाच उमेदवार निवडून आल्यास त्याचा राजीनामा घेतला जाईल, असा कडक इशारा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी दिला.

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur Municipal Election News : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक यंदा चार सदस्य पद्धतीने होणार असल्याने सर्वच पक्षांना प्रचारासाठी आणि जोडण्यासाठी तंगडतोड करावी लागणार आहे. त्यातच प्रत्येक पक्षाचा उमेदवार तितकाच ताकदवान आणि प्रभावी असणे सर्वच पक्षांसाठी गरजेचा आहे.

चार सदस्य पद्धतीने निवडणूक असल्याने एका उमेदवाराला सोबत असणाऱ्या तीन उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे. हीच खबरदारी घेत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी स्वतःच्याच पक्षातील कार्यकर्त्यांना थेट तंबी देण्यास सुरुवात केली आहे.

माझी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विनंती असणार आहे. प्रभाग चार उमेदवारांचा आहे. सगळेच उमेदवार सर्व ठिकाणी पोहोचणार नाहीत.त्यामुळे प्रत्येकाने मत मागताना चौघांसाठी देखील मागितली पाहिजे. जर एखाद्याने एकच मत मागितलं तर ते लक्षात येतं. प्रभागामध्ये एकच निवडून आला आणि इतर तिघे पराभूत झाले तर निवडून आलेल्या नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार. अशा शब्दात काँग्रेसने ते आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावड्यातील इच्छुक उमेदवारांना तंबी दिली आहे.

त्यामुळे मत मागताना संपूर्ण पॅनल साठी मत मागा अशी माझी विनंती आहे. प्रभागामध्ये एकच निवडून आला आणि इतर तिघे पराभूत झाले तर निवडून आलेल्या नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार. असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे.

काँग्रेसची दुसरी यादी आज रात्री?

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसने (Congress) पहिल्या यादीमध्ये जवळपास 48 उमेदवारांना स्थान दिल्यानंतर दुसरी यादी मध्ये कोणत्या इच्छुकाचे नाव असणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांची आघाडी असल्याने शिवसेना ठाकरे पक्षाला सात जागांवर समाधान मानावे लागणार आहे. उर्वरित 26 उमेदवार यांची यादी आज रात्री काँग्रेसकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT