BJP internal conflict : भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाण ॲक्शन मोडमध्ये; निवडणुकीच्या तोंडावर बोलावली तातडीची बैठक

BJp Politcs News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या तोंडावर वातावरण चांगलेच तापले आहे. महापलिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत.
Ravindra Chavan
Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या तोंडावर वातावरण चांगलेच तापले आहे. महापलिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, नव्या आलेल्या मंडळींना अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकीचे तिकीट पक्षाकडून दिले जात असल्याने निष्ठावंत नाराज असल्याचे चित्र आहे. त्यातच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravaindra Chavan) यांनी तातडीने त्यांच्या डोंबिवलीमधील निवासस्थानी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Ravindra Chavan
Pune BJP : पुण्यात कुटुंबातील उमदेवारांसाठी फिल्डिंग लावलेल्या आमदार-खासदारांना धक्का : मध्यरात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पत्ते कट

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तातडीने त्यांच्या डोंबिवलीमधील निवासस्थानी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.

Ravindra Chavan
Shivsena Politics : जागा वाटपाच्या बैठकीत शिवतारे-भानगिरे यांची एकमेकांना शिवीगाळ, पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. याठिकाणी महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या बैठकीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीनंतर भाजपचे जनरल सेक्रेटरी रवी गायकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Ravindra Chavan
Shivsena-NCP Yuti : सोलापुरात मोठी घडामोड; भाजपला शह देत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची युती

यावेळी रवींद्र गायकर म्हणाले की, 'अकरा वर्षे भाजपसाठी निष्ठेने काम केले, आज मात्र आमच्यावर अन्याय होत आहे. लोकसंख्या वाढली असूनही युतीमुळे सर्वच निष्ठावंतांचे पत्ते कट करण्यात आले आहेत. महायुती नकोच, पण युती करायचीच असेल तर जागावाटप अर्धे-अर्धे करा अशी आमची मागणी आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे, असे यावेळी गायकर यांनी म्हटले आहे.

Ravindra Chavan
Congress Candidate First List : काँग्रेसची 20 जणांची पहिली यादी जाहीर; शहराध्यक्ष, माजी महापौरांसह नऊ माजी नगरसेवकांना पुन्हा संधी

कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा जो फॉर्म्यूला ठरला आहे, त्यावरून भाजपमधील असंतोष उफाळून येताना दिसत आहे. कल्याण पूर्वेला भाजपला सातच जागा देण्यात आल्याने पूर्वेतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घालत घोषणाबाजी केली होती. पूर्वेनंतर आता कल्याण पश्चिमेतही भाजपला 9 जागाच देण्यात आल्याने भाजपचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी तातडीने त्यांच्या डोंबिवलीमधील निवासस्थानी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.

Ravindra Chavan
Shivsena Politics : जागा वाटपाच्या बैठकीत शिवतारे-भानगिरे यांची एकमेकांना शिवीगाळ, पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com