Municipal Vote Counting  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Election : मतदान केंद्रावर 'नो एन्ट्री, नो रॅली'! निवडणुक आयोगाचा नियम आत्ताच जाणून घ्या; अन्यथा...

Municipal Vote Counting : कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत मतमोजणीसाठी 21 डिसेंबरला कडेकोट सुरक्षा, नो एन्ट्री झोन, रॅली बंदी व मोबाईल निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व तीन नगरपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया 21 डिसेंबरला होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाद्वारे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मतमोजणी दिवशी शासकीय कर्मचारी सोडून अन्य कोणालाही केंद्राच्या 200 मीटरच्या परिसरात जाता येणार नाही. तसेच या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत या परिसरात बंदी आदेश लागू असणार आहेत.

मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणापासून दोनशे मीटर सभोवतालच्या परिसरात मतमोजणी कर्मचारी पुरवठादार, उमेदवार व त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधी व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही.

मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलिस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय रस्त्यावर, व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करता येणार नाही. परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीला मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक सहित्य बाळगता येणार नाही. तसेच या परिसरात कोणतेही शस्त्र नेण्यास बंदी आहे.

सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त प्रत्येक मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राची सुरक्षा पोलिस उपाधीक्षक, पोलिस निरीक्षक पदावरील व्यक्तीकडे असणार आहे. जलद कृती दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात येणार आहेत.

प्रत्येक मतमोजणी केंद्रावर 50 पेक्षा जास्त पोलिसांची सुरक्षाव्यवस्था असणार आहे. तसेच पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक हे स्वतः मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेचा आढावा < घेणार आहेत. केवळ सरकारी अधिकारी आणि नियुक्त केलेले राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनाच आतमध्ये ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जाणार आहे.

येथे होणार मतमोजणी

  • पन्हाळा : नगरपरिषद सांस्कृतिक हॉल, मयूर उद्यान

  • मलकापूर : नगरपरिषद कार्यालय, दुसरा मजला सभागृह

  • पेठ वडगाव : मराठा समाज सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज चौक

  • हुपरी : सभागृह, केंद्रीय प्राथमिक शाळा हातकणंगले: पहिला मजला सभागृह, तहसीलदार कार्यालय

  • जयसिंगपूर : सिद्धेश्वर यात्री निवास येथील नगरपरिषद कार्यालय

  • शिरोळ: सभागृह पहिला मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत

  • कुरुंदवाड : जिम्नॅशियम हॉल, तबक उद्यान गडहिंग्लज: पॅव्हेलियन इमारत, गांधीनगर

  • आजरा : (नगरपंचायत) : मुख्य सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत

  • चंदगड : (नगरपंचायत) तहसीलदार कार्यालय कागल (नगरपंचायत) : सावित्रीबाई फुले मार्केट, जयसिंगराव पार्क

  • मुरगूड: डॉ. बाबासाहेब आंबडेकर बौद्ध विहार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT