Santaji Ghorpade  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Santaji Ghorpade Attack: मतदारांच्या भेटी घेऊन घरी परत येताना उमेदवारावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला ; संताजी घोरपडे गंभीर जखमी

Jansuraj Shakti party candidate Santaji Ghorpade attacked during election campaign: आपलेच कार्यकर्ते असावेत किंवा काहीतरी समस्या असेल या समजाने घोरपडे ही गाडीतून खाली उतरले. मात्र पाच ते सहा जणांनी घोरपडे उतरताच त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला.

Rahul Gadkar

Kolhapur News: निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असताना करवीर विधानसभा मतदारसंघातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदार संघातील जनसुराज्य शक्तीचे उमेदवार व्हिजन चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे.

या हल्ल्यात संताजी घोरपडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. रविवारी प्रचार संपून ते घरी जात असताना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर मानवाड जवळ हा हल्ल्या झाला. हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत शेतातून पसार झाले.

घोरपडे हे प्रचारानिमित्त कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील मानवाड येथे गेले होते. भेटीनंतर ते घरी परत असताना मानवाड शेजारी त्यांना पाच ते सहा कार्यकर्ते रस्त्यावर थांबलेले दिसले.

कार्यकर्त्यांनी घोरपडे यांच्या गाडीला हात दाखवत कार थांबवली. आपलेच कार्यकर्ते असावेत किंवा काहीतरी समस्या असेल या समजाने घोरपडे ही गाडीतून खाली उतरले. मात्र पाच ते सहा जणांनी घोरपडे उतरताच त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला.

या प्रकारामुळे घोरपडे चांगलेच गोंधळून गेले. लाठी आणि सशस्त्र हल्ल्याने घोरपडे हे जखमी झाले आहेत. अंधाराचा फायदा घेत हे संशयित पाच ते सहा जण शेतातून प्रसार झाले. त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर या अज्ञातांनी गाडीवर दगडफेक केली.

जखमी घोरपडे यांना कळे येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. यावेळी कार्यकर्त्यांना घडलेल्या प्रसंगाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कळे प्राथमिक रुग्णालयात गर्दी केली. आज प्रचाराचे सांगता असल्याने हा प्रकार घडल्यानंतर करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT