Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांच्या सभेत चर्चा ‘बनवाबनवी’मधील धनंजय मानेंची... नेमकं काय घडलं?

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूरमधील निमशिरगाव येथे डॉ. रत्नाप्पा कुंभार यांच्या पुतळ्याचे अनावरण व पी. बी. पाटील सहकारी संस्था उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मानेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. या व्यासपीठावरून पवार मानेंना कोणत्या शब्दांत चिमटा काढतील, याकडे उपस्थितांचे लक्ष लागले होते. मात्र भाषणाच्या सुरुवातीलाच पवारांच्या एका विधानामुळे उपस्थितांमध्ये ‘बनवाबनवी’ या मराठी चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली.

भाषणाच्या सुरुवातीला शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोकसभेचे आमचे सहकारी 'धनंजय माने' असा धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांचा उल्लेख केल्यानंतर उपस्थितांमध्ये एक वेगळीच चर्चा पाहायला मिळाली. बनवाबनवी हा मराठी चित्रपट त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचा नेहमीचा आणि प्रसिद्ध डायलॉग असलेला धनंजय माने याचा दाखला देत उपस्थितांमध्ये हशा पिकला.

खासदार धैर्यशील माने यांनी शिवसेना (ShivSena) शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. चांगली वक्तृत्वशैली असणाऱ्या खासदारांवर 'पोपट' नावाचा शिक्का ठाकरे गटाने लावला होता. त्यात शरद पवार यांनी धनंजय माने या नावाचा उल्लेख केल्याने उपस्थितांमध्ये वेगळ्याच चर्चा रंगल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर दुसरीकडे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हेदेखील भाजपमध्ये जाण्यापूर्वी राष्ट्रवादीचे (NCP) खासदार आणि मागील निवडणुकीतील उमेदवार होते. शरद पवार कोल्हापुरात आल्यानंतर धनंजय महाडिक यांना अद्यापही विसरले नाहीत, अशी एक चर्चाही उपस्थितांमध्ये होती.

वास्तविक पाहता शरद पवार यांच्याकडून धनंजय माने असा उल्लेख अनवधानाने झाला होता किंवा त्यांना लिहून दिलेल्या उपस्थितांच्या नावांत गडबड होती, असेही म्हणता येईल. मात्र शरद पवार यांची स्मरणशक्ती इतकी प्रचंड आहे, की दोन दिवसांपूर्वी एका सभेत त्यांनी कोंडोजी वाघ या कार्यकर्त्याचा आवाज ओळखून दाखवला. मात्र धैर्यशील माने यांच्या ठिकाणी धनंजय माने नावाचा उल्लेख केल्याने सभास्थळी वेगळीच चर्चा होती.

(Edited By – Rajanand More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT