Ayodhya : अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. पण भाजपकडून या सोहळ्याचे राजकारण केले जात असल्याचे कारण देत काँग्रेससह इतर काही पक्षांनी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सोहळ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. पण या सोहळ्याला येणार नसल्याचे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना पत्राद्वारे कळवले आहे. पण त्यामध्ये त्यांनी भाजप (BJP) किंवा इतर कोणतेही राजकीय कारणाचा उल्लेख केलेला नाही. आपण नंतर रामलल्लाच्या दर्शनाला येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पवारांनी म्हटले आहे की, 22 जानेवारीच्या सोहळ्यानंतर श्रीरामाचे दर्शन सहज आणि आरामदायीपणे घेता येईल. माझा अयोध्येत येण्याचा कार्यक्रम ठरला आहे. त्यावेळी मी श्रध्दापूर्वक दर्शन घेईन. तोपर्यंत मंदिराचे कामही पूर्ण झालेलं असेल, असे पवारांनी स्पष्ट केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम हे केवळ भारतच नव्हे तर जगभरातील भक्तांची श्रध्दा आणि आस्थेचे प्रतिक आहेत. अयोध्येतील सोहळ्याची भक्तांना आतुरता आहे. मोठ्या संख्येने भक्त तिथे पोहचत आहेत. त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद माझ्यापर्यंत पोहचेल. २२ जानेवारीच्या सोहळ्यानंतर रामलल्लाचे दर्शन सहजपणे करता येईल, असे पवारांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसने (Congress) सोहळ्याला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून या सोहळ्याचा राजकीय इव्हेंट केला जात असल्याचा आरोप काँगेसने केला आहे. त्याचीच री ओढत इतर काही भाजपविरोधी पक्षांतील नेत्यांनी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.