Ravikiran Ingole 
पश्चिम महाराष्ट्र

Ravikiran Ingole: "जामिनावर बाहेर आल्यानंतर नवऱ्याला जिवंत ठेवणार नाही"; ठाकरे सेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाची महिलेला धमकी

Ravikiran Ingole: कोल्हापुरात पक्षाच्या कार्यालयात बोलावून या महिलेला शिवसेना युबीटीच्या माजी पदाधिकाऱ्यानं धमकी दिली आहे.

Rahul Gadkar

Ravikiran Ingole: पक्षाच्या कार्यालयात बोलवून ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी एका महिलेला धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या पतीने जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे धाव घेऊन तक्रार दिली आहे. तुझ्या नवऱ्याला मारण्यासाठी मीच लोकांना पाठवले होते. तुझा नवरा माझ्या तावडीतून आता वाचला असला तरी जामिनावरून बाहेर आल्यावर त्याला जिवंत ठेवत नाही. भरपूर लोकांना वर पाठवले आहे अशी धमकी संबंधित महिलेला दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हा प्रकार 2 मे 2026 रोजी घडला असून शक्ती विक्रम भोसले राहणार शाहूपुरी तिसरी गल्ली कोल्हापूर यांनी याबाबत रविकिरण इंगवले (रा. शिवाजी पेठ,), शुभम सूर्यवंशी (रा. लक्षतीर्थ वसाहत), यश संतोष जाधव, आशिष अशोक जाधव (दोघेही रा. वारे वसाहत कोल्हापूर) यांच्यासह पाच ते सहा अज्ञातांवर तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, 2 मे 2026 रोजी तक्रारदार भोसले त्यांचे डेकोस्टोन टाईल्स शोरुमध्ये असताना एका अनोळखी महिलेने शोरुच्या गेटजवळ बोलावून घेतले. यातील संशयित आरोपी शुभम, आशिष यश आणि 6 ते 7 अज्ञात व्यक्तींनी "तू रविकिरण इंगवले साहेबांबद्दल नाही ते बोलतोस, हे आम्हाला कळाले आहे. व त्यांनीच आम्हाला येथे पाठवले आहे" असे म्हणून कानशिलात लगावून, त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या खांद्यावर, पोटावर, डोक्यात मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी केले व "तू इथून बाहेर निघून दाखव तुला दाखवतो" अशी धमकी दिली.

तसेच भोसले हे राजारामपुरी पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटकेत असताना रविकिरण विष्णूपंत इंगवले यांनी फिर्यादींची पत्नी हिला त्यांच्या खरी कॉर्नर, गांधी मैदान कोल्हापूर येथील ऑफिसमध्ये 13 मे रोजी बोलवून घेतले. यावेळी इंगवले यांनी "तुझ्या नव-याला मारणेसाठी मीच त्या लोकांना पाठवले होते. तुझा नवरा आता माझ्या तावडीतून वाचला असता तरी त्याला जेलमधून जामिनावर बाहेर आल्यानंतर जिवंत ठेवत नाही, मी ब-याच लोकांना वर पाठवलेले आहे." अशी धमकी दिल्याचे तक्रारीत पतीने म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT