

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव असलेल्या शिवसेनेचा विस्तार आता देशभर करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी शिंदे यांनी राज्य प्रमुखांना सात महत्त्वाच्या मुद्द्यांचा कानमंत्र दिला.
शिवसेनेच्या राज्य प्रमुखांची बुधवारी आढावा बैठक झाली. या बैठकीत दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाना, ओडिशा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि उत्तर प्रदेश यांसह विविध राज्यांतील पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी, लोककल्याणाच्या कामातून पक्षाचा विस्तार करण्याच्या सूचना शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक प्रश्नांवर काम करण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देतानाच शिक्षण, क्रीडा, रोजगार, आरोग्य, पाणी, रस्ते आणि कृषी या सात विषयांवर प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी गरज पडल्यास संबंधित राज्यांमध्ये ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन उभारण्याचा सल्लाही शिंदे यांनी दिला. संघटन मजबूत करण्यासाठी विविध राज्यांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये स्थानिक प्रश्न हातात घेऊन जनतेशी थेट जोडले जाणे आणि त्यातून शिवसेनेची संघटना उभी करणे, हा या बैठकीतील प्रमुख संदेश मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.