Manoj Jarange: शिष्टमंडळाशी चर्चेनंतरही जरांगेंची माघार नाहीच! 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा; सातारा-कोल्हापूर गॅझेटचा 'जीआर'साठी दिला अल्टिमेटम

Manoj Jarange: कुणबी प्रमाणपत्रांच्या पडताळणी दरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे.
Manoj Jarange Patil
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange: कुणबी प्रमाणपत्रांच्या पडताळणी दरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे. अभ्यासकांशी चर्चा केल्यानंतर हे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलं आहे. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, प्रसाद लाड, मकरंद पाटील यांचा समावेश आहे. यावेळी जरांगेंची शिष्टमंडळाशी महत्वाची चर्चा पार पडली.

Manoj Jarange Patil
Marathwada Drought: मराठवाडा, विदर्भाच्या दुष्काळावर 'ऑस्ट्रेलिया'चा उतारा! फडणवीस सरकारनं केला महत्वाचा करार

चर्चेतील महत्वाचे मुद्दे

१) यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारकडं मागणी केली की, ५८ लाख नोंदणी प्रमाणपत्र डिजिटलाईज करा. याला थोडा वेळ लागला तरी चालेल पण आधी प्रमाणपत्रांचे वाटप करा.

२) तसंच हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजातील ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशी मागणीही जरांगेंनी यावेळी केली.

३) तसंच ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची यादी ही ५ सप्टेंबपर्यंत ग्रामपंचायतींच्या कार्यालयात लावण्यात यावी, अशी महत्वाची मागणीही यावेळी जरांगेंनी शिष्टमंडळाकडं केली.

४) यावेळी ३० लाख लोकांना डिजिटल प्रमाणपत्रं अत्तापर्यंत दिली असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी जरांगेंना दिली. तसंच जे अर्ज करतील त्यांना डिजिटल प्रमाणपत्र देणार असल्यचंही यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.

५) मराठवाड्यातील मुलांनी उद्यापासून कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असं आवाहन चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी केलं.

सातारा-कोल्हापूर गॅझेटच्या 'जीआर'साठी अल्टिमेटम

ज्या कुणबी प्रमाणपत्रांच्या पडताळणीमध्ये अडचणी येत आहेत, त्यावरील तोडग्यावर चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळापुढे सातारा-कोल्हापूर गॅझेटच्या जीआरचा मुद्दा उपस्थित केला. तसंच उद्यापर्यंत हा शासन निर्णय काढावा असा अल्टिमेटम जरांगेंनी यावेळी शिष्टमंडळाला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com