Prashant Koratkar Arrested Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prashant Koratkar : 30 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा! फक्त एक चूक अन् कोरटकरला अटक, पाहा संपूर्ण घटनाक्रम

Prashant Koratkar Arrested After 30 Days Escape: गेल्या 30 दिवसांपासून पोलिसांनी गुंगारा देणारा प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांना सापडला. त्याला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकत तेलंगणामधून ताब्यात घेतलं.

Aslam Shanedivan

9Kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला तेलंगणामधून अटक करण्यात आली असून आज (ता.25)सकाळी त्याला कोल्हापूर येथे आणण्यात आलं.

यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून देखील धमकी दिली होती. याप्रकरणी गेल्या 30 दिवसापासून त्याचा शोध सुरू होता.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महारांबद्दल यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना कोटकरने धमकी दिली होती. या प्रकरणी सावंत यांनी येथील जूना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ज्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पण गुन्हा दाखल होताच कोरटकर पोलिसांची सुरक्षा असतानाही पळाला. तो आधी शेजारील मध्यप्रदेशात गेल्याची माहिती मिळत होती. त्याप्रमाणे नागपूरसह त्याचा शोध मध्यप्रदेशमध्ये घेतला गेला. मात्र तो तेथे सापडला नाही.

दरम्यान दुबई येथील त्याचा एक फोटो समोर आल्याने तो दुबईत पळून गेला अशा चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे त्याच्या नावे पोलिसांनी लूक आऊट नोटील बजावली होती. यानंतर कोरटकर यांच्या पत्नीने त्यांचा पासपोर्ट जमा केल्याने तो भारतातच असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध आणखीन जोमाने सुरू केला होता.

ही चूक पडली महागात

गेल्या 30 दिवसांपासून फरार असलेला कोरटकर हा त्याच्या एका चुकीने पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याचा विश्वासू सहकारी असणारा परीक्षित तेलंगणात फिरताना दिसून आला यामुळे तो तेलंगणात असणार असा पक्का निर्णय पोलिसांचा झाला. त्या पद्धतीने कोरटकरचा शोध पेलिसांनी घेतला आणि कोरटकर पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला.

पोलिसांनी येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात सर्च ऑपरेशन राबवत कोरटकर आणि परीक्षित याला ताब्यात घेतलं. त्यानंतर कोरटकर आणि परीक्षितला कोल्हापूर पोलिसांकडे सोपवण्यात आले असून त्यांना कोल्हापूरमध्ये आणण्यात आले. आज (ता. 25) त्यांना येथील छत्रपती प्रमिलाराजे रूग्नालयात मेडिकल केल्यानंतर न्यायालयात हजर केले गेले. पण कोरटकरला कोल्हापूरमधील जनता धडा शिकवण्यासाठी गनिमा कावा करेल अशी शंका पोलिसांनाही होती.

याचपार्श्वभूमीवर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवला होता. जवळपास अडीचशे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवप्रेमींचा संताप पाहून जुना राजवाडा पोलिसांनी कोरटकरला मुख्य दरवाजा ऐवजी मागच्या दरवाजाने न्यायालयात नेले.

यावेळी न्यायालयाने कोरटकर याला 7 दिवसांची पोलिस कोठची मागणी केली आहे. दरम्यान प्रशांत कोरटकरला अटक झाल्याने त्याच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान पोलिसांनी मागच्या दरवाज्याने न्यायालयात नेल्याने शिवप्रेमींनी पोलिसांचा निषेध केला. तसेच आक्रमक झालेल्या शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलीस ठाणे आणि व्हॅनवर चिल्लर उधळत या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे.

असा आहे या प्रकरणाचा घटनाक्रम :

25 फेब्रुवारी रोजी इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी कोरटकरने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्याप्रमाणे संध्याकाळी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

26 फेब्रुवारीला त्याने अटक होणार म्हणून आपल्या नागपूरमधील घरातून पलायन केले. पण 27 फेब्रुवारीला त्याने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आहे असं सांगणारा एक व्हिडिओ व्हायरल केला

28 फेब्रुवारीला कोल्हापुरच्या न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. यानंतर 3 मार्चला त्याचे आलिशान गाड्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले 11 मार्चच्या सुनावणीदरम्यान कोरटकरला 17 मार्चपर्यंत दिलासा मिळाला. पण 18 मार्चला झालेल्या सुनावणीवेळी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

यादरम्यान कोरटकर दुबईला पसार झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या याबाबतचे काही फोटो व्हायरल झाले. ज्यात तो दुबईत असल्याचे दिसत होते. यावरून 22 मार्च रोजी कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली.

23 मार्च अखेर कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणामधून मुस्क्या आवळत ताब्यात घेतलं. आज न्यायालयात हजर केलं असता त्याला 7 दिवसांची पोलिस कोठही मागणी केली आहे. पण अद्याप न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नसून पोलिस कोठही मिळणार का याच्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT