Prashant Koratkar : कोरटकर पोलिस ठाण्यात, शिवप्रेमी शासन करण्याच्या तयारीत

Prashant Koratkar News : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनाही धमकी दिली होती.
Prashant Koratkar
Prashant Koratkarsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला काल कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथून ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक आज सकाळी कोल्हापुरात दाखल झाले आहे. आज सकाळी तब्बल 10 ते 15 तासाचा प्रवास करत कोल्हापूर पोलिसांचे पथक सकाळी साडेसात वाजता कोल्हापुरात दाखल झाले. आज सकाळी आठ वाजता त्याला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणले जाणार आहे. कोरटकर सोबत परिक्षीत नावाचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून कोरटकरला ११ वाजता न्यायालयात करणार हजर केले जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसह छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभर संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी कोरटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर बऱ्याच दिवसांपासून तो फरार होता. त्याचा तपास आणि शोध पोलिस घेत होते.

मात्र तो पोलिसांना चकवा देत फिरत होता. दरम्यान तो दुबईला पळाल्याच्या चर्चा सुरू झाली होती. तसा त्याचा फोटोही व्हायरल झाला होता. ज्यामुळे पोलिसांनी त्याला लूकआऊट नोटीस बजावली होती. पण कोरटकर यांच्या पत्नीने त्याचा पोसपोर्ट पोलिसांना दिल्याने तो भारतातच असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता त्याला तेलंगणातून अटक केली आहे.

Prashant Koratkar
Prashant Koratkar arrest : तीन दिवसांत पोलिसांची दोन तासांची झोप अन् कोरटकरला बेड्या, कसा सापडला?

दरम्यान या पार्श्वभूमीवर 25 फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यानंतर कोल्हापुरातील शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या होत्या. सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. खबरदारी म्हणून कोल्हापूर पोलिसांकडून ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोर्ट कर यांच्याबाबत संताप व्यक्त असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. जुना राजवाडा पोलीस स्टेशन, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय आणि न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान अनेक दिवसापासून गंगारा देणाऱ्या कोरटकरसह पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतलं असून परिक्षीत नावाचा सहकाऱ्याला अटक केली आहे. कोरटकरला ताब्यात घेतल्यानंतर कोल्हापुरातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. तर कोल्हापुरात ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोरडकर ला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतात शिवप्रेमींकडून आनंद व्यक्त होत असताना समाज माध्यमांवर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. नागपूरच्या कोरटकर ला पोलिसांनी ताब्यात घेतला. कोल्हापूरच्या मावळ्यांनो कोरटकर च्या स्वागताला पायतान घेऊन या. असे आवाहन शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.

Prashant Koratkar
Prashant Koratkar : 'त्या' सगळ्यांची चौकशी करणार! कोरटकरला तेलंगणातून उचलल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी दिली मोठी अपडेट
शिवभक्त त्याला शासन करतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान या कोरटकरने केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे. आमच्या भावना संतप्त आहेत. त्याचं स्वागत आम्ही कोल्हापुरी पायतानाने आणि करू. अशी क्रूर वक्तव्य करणाऱ्या परत करला शिवप्रेमीत शासन करतील. त्याचा करेक्ट कार्यक्रम गनिमी काव्यानेच होणार, या शब्दात प्रेमी हर्षल सुर्वे यांनी प्रशांत कोरटकर याला कोल्हापुरात आणताच प्रतिक्रिया दिली आहे.
-हर्षल सुर्वे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com