Prashant Koratkar : कोरटकर तुमचा जावई आहे का? शिवप्रेमींचा पोलिसांना सवाल, त्याची गाढवावरून धिंड काढा

Kolhapurkar On Prashant Koratkar : कोरटकरला अटक होताच त्याचा निषेध करण्यासाठी शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडे धाव घेत त्याला आम्हीच धडा शिकवू असा पवित्रा घेतला आहे
Kolhapurkar On Prashant Koratkar
Kolhapurkar On Prashant Koratkarsarkarnama
Published on
Updated on

Kolhapurkar News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तत्पूर्वी कोल्हापुरातील शिवप्रेमी कोरटकरचा निषेध करण्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर दाखल झाले. तसेच कोल्हापूरच्या शिवप्रेमींनी पोलिसांवर रोष व्यक्त करताना, 'कोरटकर तुमचा जावई आहे का? असा सवाल करताना, 'त्याची गाढवावरून धिंड काढा', अशी मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकरने धमकी दिली होती. याप्रकरणी येथील जूना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर 30 दिवसांपासून कोरटकर फरार होता. पण सोमवारी (ता.24) त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आज कोल्हापुरात आणलं आहे.

यादरम्यान कोल्हापुरातील शिवप्रेमींनी कोरटकरचा निषेध करण्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर दाखल गर्दी केली. यावेळी शिवप्रेमींना बाजूला करण्यासाठी पोलीस पुढे होताच शिवप्रेमी आक्रमक झाले. कोरटकर तुमचा जावई आहे का? असे म्हणत शिवप्रेमींनी पोलिसांनाच जाब विचारला. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर तणावाच वातावरण निर्माण झाला. कोरटकरला अकरा वाजता न्यायालयात हजर करणार आहेत. पूर्वी कोरटकरवर हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

Kolhapurkar On Prashant Koratkar
Prashant Koratkar : कोरटकर पोलिस ठाण्यात, शिवप्रेमी शासन करण्याच्या तयारीत

कोरटकरला अटक होताच त्याचा निषेध करण्यासाठी शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडे धाव घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कदापी आम्ही सहन करणार नाही. त्याला आम्हीच शासन करू. पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.

Kolhapurkar On Prashant Koratkar
Prashant Koratkar : 'त्या' सगळ्यांची चौकशी करणार! कोरटकरला तेलंगणातून उचलल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी दिली मोठी अपडेट

दरम्यान त्याबाबत निषेध व्यक्त करत असताना जुना राजवाडाच्या पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिवप्रेमींना बाजूला हटवले. त्यावर आक्रमक होत शिवप्रेमींनी पोलिसांनाच धारेवर धरले आहे. छत्रपती शिवरायांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्याला का संरक्षण का देत आहात? त्याची गाढवावरून धिंड काढत न्यायालयात न्यावे अशी मागणी या शिवप्रेमींकडून केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com