पश्चिम महाराष्ट्र

Prashant Koratkar : 'त्या' सगळ्यांची चौकशी करणार! कोरटकरला तेलंगणातून उचलल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी दिली मोठी अपडेट

Kolhapur Police On Prashant Koratkar case : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आल्यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रकरणातील सोमवारी (ता.24) मीडियाशी संवाद साधला.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला तेलंगणा येथील मनचरियाल याठिकाणी अटक केली आहे. सुमारे महिनाभर तो फरार होता. यावरुन महाराष्ट्र राजकारण चांगलंच तापलं होतं. तसेच कोरटकरच्या अटकेवरुन विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी महायुती सरकारचे अनेकदा वाभाडेही काढले होते. अखेर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) तेलंगणामधून अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant )यांना धमकी दिल्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आल्यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रकरणातील सोमवारी (ता.24) मीडियाशी संवाद साधला.

पंडित म्हणाले, मनचरियाल रेल्वे स्टेशनच्या बाजूला त्याच वास्तव्य होतं.कोल्हापूर पोलिसांचं पथक कोल्हापूरसाठी रवाना झालं आहे. चंद्रपूर येथे काही दिवस वास्तव्यास होता.एक महिन्यामध्ये कोरटकरला कुणी कुणी मदत केली, त्या सगळ्यांचाच तपास होणार आहे. उद्या सकाळी प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापुरात दाखल होणार आहे.

तेलंगणावरून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. उद्या कोल्हापुरात येताच कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी तेलंगणा राज्यातल्या मंचरियाल इथून कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंडित यांनी दिली.

इंद्रजीत सावंत म्हणाले, अशा चिल्लर माणसाने खरंतर एक महिना, आमच्या कोल्हापूरच्या भाषेत बोलायचं झालं तर तंगवातंगवी केली, ही खूप मोठी गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये ही आहे की, एक महिनाभर झालं संपूर्ण महाराष्ट्रातील देश-विदेशातील तमाम शिवप्रेमी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सरकारसह पोलिस यंत्रणावरचा दबाव दिवसेंंदिवस वाढतच चालला आहे.

तसेच त्या सगळ्या शिवप्रेमींचे पहिल्यांदा मी आभार मानतो, की त्यांनी खूप चांगल्या पाठिंबा दिला. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर दबाव आला. पोलिस यंत्रणेने देखील चांगलं काम केलं. एका विकृत व्यक्तीला अटक झालेली आहे, त्याबद्दल समाधान आहे. पण येथून पुढे जाऊन जोपर्यंत अशा व्यक्तीला कायदेशीरित्या शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.’’ असंही इंद्रजीत सावंत यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT