Kolhapur Police crime Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Police crime : रक्षकच बनला भक्षक! जबाब घ्यायला गेलेल्या पोलिसाने पीडित मुलीची छेड काढली; कोल्हापुरातील संतापजनक घटना

Kolhapur police misconduct : कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाला काळीमा फासणारी घटना गुरुवारी (ता.03) रात्री घडली आहे. ज्या पोलिसांच्या हातात समाजाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. त्याच खाकी वर्दीतील पोलिसाने एका मुलीसोबत असभ्य वर्तन केल्याची घटना घडली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 04 Apr : कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा पोलिस दलाला काळीमा फासणारी घटना गुरुवारी (ता.03) रात्री घडली आहे. ज्या पोलिसांच्या हातात समाजाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. त्याच खाकी वर्दीतील पोलिसाने एका मुलीसोबत असभ्य वर्तन केल्याची घटना घडली आहे.

पीडित मुलीने हाताला कापून घेतल्याने तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलीचा जबाब घेण्यासाठी गेलेल्या एका पोलिसांनेच पीडित मुलीशी असभ्य वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिस (Police) कॉन्स्टेबलवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलीने हाताला कापून घेतल्याने तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदर्भातील माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांकडून जबाब घेण्यासाठी एका पोलिस कॉन्स्टेबलला रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

जखमी झालेल्या मुलीचा जबाब नोंदविण्यासाठी तो गुरूवारी रात्री साडेआठच्या सुमारास रुग्णालयात गेला होता. मात्र त्याच पोलिसानेच मुलीशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार घडला. याबाबतची माहिती मुलीने पोलिसांना दिली. त्या प्रकरणी चेतन दिलीप घाटगे (बक्कल क्रमांक 420) या पोलिसावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जबाब नोंदविण्यासाठी संशयित चेतन घाटगे बुधवारी रात्री रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आला होता. यावेळी त्याने स्वतःचा मोबाईल क्रमांक या मुलीला दिला. "तू माझी मैत्रीण आहेस, भिऊ नको. काही अडचण असल्यास मला फोन कर" असे सांगत तिला ठिकठिकाणी छेडछाड केल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT