Pune News : आमदाराच्या पीएच्या पत्नीचा प्रसुतीवेळी मृत्यू, आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश; पाच सदस्यांची समिती गठीत!

Tanisha Bhise Death Pune : अपूर्ण माहितीच्या आधारे रुग्णालायवर आरोप केले जात असल्याचे स्पष्टीकरण दीनादान मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डाॅ.धनंजय केळकर यांनी दिले आहे.
Tanisha Sushant Bhise
Tanisha Sushant Bhisesarkarnama
Published on
Updated on

Pune News : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 10 लाख डिपॉझिटची मागणी करत गर्भवती पत्नीला उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांनी केला होता. या प्रकरणाची दखल आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी घेतली असून या रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून देखील रुग्णालयात चौकशी करण्यात येणार असून रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहे.

Tanisha Sushant Bhise
MNS Politics : गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बोलताना मनसे नेत्याची जीभ घसरली; म्हणाले, 'कुत्रा...'

रुग्णालयाकडून स्पष्टीकरण

अपूर्ण माहितीच्या आधारे रुग्णालायवर आरोप केले जात असल्याचे स्पष्टीकरण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डाॅ.धनंजय केळकर यांनी दिले आहे. ते म्हणाले, आम्ही या प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार करून आरोग्य विभाग आणि शासनाकडे पाठवणार आहोत. तेथे आमच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांचे स्पष्टीकरण दिले जाईल.

पाच सदस्यांची समिती गठीत

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने 10 लाखांची मागणी करत उपचार नाकारल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी खालील प्रमाणे चौकशी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमचे अध्यक्ष डॉ. राधाकिशन पवार ( उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडल) असणार असून डॉ. प्रशांत वाडीकर (सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ), डॉ. नागनाथ यम्पल्ले (जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय औंध), डॉ. निना बोराडे ( मुख्य वैद्यकीय अधिकारी, पुणे महानगरपालिका) डॉ. कल्पना कांबळे (वैद्यद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ज्ञ) हे सदस्य असणार आहेत. ही समिती रुग्णालयाला भेट देऊन सविस्तर अहवाल सरकारला सादर करणार आहे.

रुग्णालयांची झाडाझडती घेणार

चिवटे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे विधी व न्याय खात्या अंतर्गत एक समिती गठित करण्यात येणार असून ती समिती पुणे शहर आणि जिल्ह्यातील धर्मादाय अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांची झाडाझडती घेणार आहे. निर्धन घटकातील रुग्णांसाठी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांसाठी आरक्षित असलेल्या बेड वर मोफत किंवा 50 टक्के सवलतीच्या दरात उपचार केले जात आहेत की नाही ? याचा सविस्तर आढावा ही समिती घेईल.

Tanisha Sushant Bhise
Nandurbar Guardian Minister : नंदुरबारचे पालकमंत्री खरच हरवले? दोन महिने उलटले तरी फिरकले नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com