Jaykumar Gore Video : 'त्यांना कायमचे संपवून माझ्यासोबत बीडप्रमाणे कट घडवायचा होता', जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप; म्हणाले, पुरावे माझ्या...

Jaykumar Gore Claims Conspiracy Against Him Police : पोलिस प्रभाकर देशमुख यांची चौकशी करणार आहेत, याबाबत पत्रकारांनी मंत्री जयकुमार गोरे यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.
Jaykumar Gore
Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

Jaykumar Gore News : मंत्री जयकुमार गोरे यांनी खंडणी प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. ज्या महिलेच्या आडून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता, असा दावा गोरेंनी केले आहे. बीडप्रमाणे माझ्या विरोधात कट रचला गेला होता. मात्र, मी पुरावे गोळा केले आणि वाचलो, असे गोरे म्हणाले.

'त्यांनी कट करतानाचे व्हिडिओ रेकाॅर्डिंग माझ्याकडे आहे. ऑडिओ माझ्याकडे आहेत. याच्यामध्ये बीडची पुनरावृत्ती करण्याचा प्लॅन होता. संबंधितांना कायमचे संपवून त्यांचे षडयंत्र माझ्यावर रचण्यापर्यंतचा यांचा प्लॅन होता. याचे पुरावे आत्ताही माझ्याकडे आहेत. तपास चालू आहे. तपास होऊ द्या तपास झाल्यावर बोलीन', असे देखील जयकुमार गोरे म्हणाले.

Jaykumar Gore
Satish Bhosale News : 'खोक्या'ला वन विभागाच्या कोठडीत मारहाण..? वकिलाच्या दाव्यानंतर न्यायालयानं दिला 'हा' मोठा निर्णय

जयकुमार गोरे यांनी अश्लील फोटो पाठवून विनयभंग केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी घेताना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर जयकुमार गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांकडून अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

या प्रकरणी प्रभाकर देशमुख यांची चौकशी करण्यासाठी पोलिस देखील त्यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र, ते घरी नसल्याने पोलिस त्यांच्या ड्रायव्हरला सोबत घेऊन साताऱ्याला गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते की ज्या महिलेने मंत्री गोरे यांच्यावर आरोप केले होते ती महिला प्रभाकर देशमुख यांच्या संपर्कात होती.

मी काही बोलणार नाही...

पोलिस प्रभाकर देशमुख यांची चौकशी करणार आहेत, याबाबत पत्रकारांनी मंत्री जयकुमार गोरे यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्याकडे बोलण्यासारखे खूप काही आहे. मात्र, पोलिस तपास सुरू असल्याने मी काही बोलणार नाही, असे गोरे म्हणाले.

Jaykumar Gore
Waqf Amendment Bill: मोदी सरकारचं तिसऱ्या टर्ममधलं सर्वात मोठंं यश! लोकसभेनंतर राज्यसभेतही 'वक्फ दुरुस्ती विधेयक' मंजूर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com