Kolhapur BJP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur BJP Politics: जुन्याच कार्यकर्त्यांना भाजप जिल्हाध्यक्ष पदाची संधी! माधुरी मिसाळांनी नव्यांना ठणकावले

BJP leader Madhuri Misal addresses new party workers in Kolhapur: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम सुरू आहे. भाजपकडून जिल्हा अध्यक्ष निवडण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत.

Rahul Gadkar

MLA Madhuri Misal Strong Message to New BJP Workers: लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या अधिकाधिक आणि दिवसेंदिवस वाढत आहे.

नव्याने भाजपमध्ये आलेल्या लोकप्रतिनिधींना पद देत जुन्या भाजप कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे, असा आरोप सातत्याने जुन्या भाजप कार्यकर्त्यांकडून होत आला आहे. भाजपच्या नेत्या आणि कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी नव्या कार्यकर्त्यांना ठणकावत कार्यकर्त्यांना दिलासा दिला आहे.

कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी भाजपच्या कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीनंतर बोलताना माधुरी मिसाळ यांनी बोलताना, भारतीय जनता पक्षाचे काम ज्याने दहा वर्षांपेक्षा अधिक केले आहे, अशा कार्यकर्त्यालाच पक्षाचे जिल्हाध्यक्ष केले जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम सुरू आहे. सदस्य नोंदणी पार पडल्यानंतर आता कोल्हापूर शहर आणि हातकणंगले भागात भाजपकडून जिल्हा अध्यक्ष निवडण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत.

निमित्ताने राज्यमंत्री आणि कोल्हापूरच्या सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी कोल्हापूर दौऱ्यावर येत इच्छुकांची मुलाखती घेतल्या. आज पक्षाच्या कार्यालयात निरीक्षक म्हणून आलेल्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी इच्छुकांशी संवाद साधला. खासदार धनंजय महाडिक, पक्षाचे आजी, माजी जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी आणि त्यानंतरही अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा योग्य तो सन्मान पक्षाने राखला असून, त्यांना भविष्यात चांगली संधी दिली जाईल. मात्र, आता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून जुन्याच कार्यकर्त्याची निवड करावी, असे पक्षाने धोरणात्मक पातळीवर ठरवले आहे. असे मंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी पुन्हा आपली इच्छा व्यक्त केली आहे. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी देखील जिल्हाध्यक्ष पदासाठी भाजप वरिष्ठांकडे मागणी केली आहे. महिला मोर्चा अध्यक्ष रूपाराणी निकम हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी मिसाळ यांनी संवाद साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT