Pakistani Youtube Channels: मोदींचा डिजिटल स्ट्राईक! पाकिस्तानच्या16 यूट्यूब चॅनेलवर बंदी; क्रिकेटर शोएब अख्तरलाही दणका

Big Action by India After Pahalgam Attack: मोदी सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला आहे. भारत-पाक संबंधातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने काही मोठे निर्णय घेतले आहेत.
Big Action by India After Pahalgam Attack:
Big Action by India After Pahalgam AttackSarkarnama
Published on
Updated on

India Bans 16 Pakistani YouTube Channels: पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकार पाकिस्तानविरोधात कडक कारवाईची पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. मोदी सरकारने आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानच्या अनेक मोठ्या युट्युब चॅनल्सवर बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या चॅनल्समध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनेलचाही समावेश आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर प्रक्षोभक आणि संवेदनशील सांप्रदायिक मजकूर पसरवणाऱ्या अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर भारताने कारवाई केली आहे. एकूण ६३ दशलक्ष सबस्क्रायबर्स असलेल्या १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार भारत, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक, खोटी, दिशाभूल करणारी विधाने आणि खोटी माहिती पसरविणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूज सह १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे.

Big Action by India After Pahalgam Attack:
Pahalgam Terror Attack: मोदींच्या करारी जवाबाला पाकिस्तानी नेते घाबरले! लष्कर प्रमुख अन् बिलावल भुट्टोंच्या कुटुंबांचे पलायन

या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. मोदी (Modi) सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला आहे. भारत-पाक संबंधातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने काही मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पाकिस्तानशी कोंडी होण्यास सुरवात झाली आहे. भारतातील पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी पाठविण्यास आले आहे.

गेल्या 24 तासात भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये 10 दहशतवाद्यांची घरे उद्धवस्त केली आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक बैसरन भागात तपास करीत आहेत. जगभरात या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध होत असताना कॅनाडाने मात्र मौन बाळगले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. पंधरा देशाच्या प्रमुखांनी त्याचा निषेध केला आहे. अनेक देशात पाकिस्तानी दूतावासाच्या बाहेर आंदोलन करण्यात येत आहे. पाकिस्तानवर कारवाई करा, अशी मागणी आंदोलनकर्ते करीत आहेत.

Big Action by India After Pahalgam Attack:
Prakash Ambedkar Exclusive Interview: महाराष्ट्रच ठरवेल राष्ट्रीय राजकारणाचा प्रवाह!

दरम्यान, पाकिस्तानी पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांनी आपल्या परिवाराला कॅनडा येथे पाठवले असल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांनीही आपल्या परिवाराला पाकिस्तानच्या बाहेर पाठवल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. पाकिस्तानचे नेता भारताच्या करारी जवाबाला घाबरले असल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com