Ajit Pawar And Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Kolhapur Politics : भाजप, शिंदेंनंतर आता अजितदादांचाही कोल्हापुरवर डोळा! शरद पवारांना देणार आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का

Sharad Pawar Political Setback : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्वच उमेदवारांची धूळधाण उडाल्यानंतर अनेक माजी आमदारांना आपल्या राजकीय करिअरची चिंता लागून राहिली आहे. तर सत्तेशिवाय राजकारण नाही याची खात्री पटल्याने अनेक जण महाविकास आघाडीमधील माजी आमदार हळूहळू महायुतीकडे जात आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News, 12 Feb : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्वच उमेदवारांची धूळधाण उडाल्यानंतर अनेक माजी आमदारांना आपल्या राजकीय करिअरची चिंता लागून राहिली आहे. तर सत्तेशिवाय राजकारण नाही याची खात्री पटल्याने अनेक जण महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) माजी आमदार हळूहळू महायुतीकडे जात आहेत.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील माजी आमदारांची पावले पडत आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निवडणुकीच्या तोंडावर गेलेल्या दोन माजी आमदारांनी देखील निर्णय घेतला आहे. त्यातील माजी आमदार सुजित मिनचेकर यांनी शिंदेंच्या सेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. तर माजी आमदार उल्हास पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत.

आता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर देखील आघाडीतील माजी आमदार असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. हातकणंगलेमधील माजी आमदार आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे नेते राजीव किसनराव आवळे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. मात्र शक्य तितक्या लवकर पक्षप्रवेश होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राजीव आवळे हे 2004 च्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावरून ते हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

2009 व 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी जनसुराज्याला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आवळे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सक्रिय सहभाग नोंदवला होता.

दरम्यान पक्ष प्रवेशा संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची देखील भेट घेतल्याचे सांगितले जाते. तर इचलकरंजी मधील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अशोक जांभळे हे देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अधिवेशनानंतर कोणत्याही दिवशी त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित केला जाणार आहे. नुकतेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी पत्र देत आपण तुमच्यासोबत काम करण्यास तयार असल्याचं कळवलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून अशोक जांभळे यांची ओळख आहे. 1995 च्या दरम्यान ते विधान परिषदेवर आमदार राहिले आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आज ही जांभळे गट सक्रिय आहे. वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय असलेले त्यांचे चिरंजीव नितीन जांभळे यांचे निधन झाले. तर दुसरे चिरंजीव सुहास जांभळे सध्या राजकारणात सक्रिय आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT