Prakash Abitkar, Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : "जिल्ह्याने 6 आमदार दिले, पण..."; मंत्री आबिटकरांनी खंत व्यक्त करत उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

Prakash Abitkar On Uddhav Thackeray : माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आबिटकरांनी शिवसेनेच्या मागील नेतृत्वाबाबत खंत व्यक्त केली. जिल्ह्याने सहा आमदार देऊन देखील काही मिळालं नव्हतं. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याला पहिल्यांदाच मंत्रीपद दिल्याने शिवसेनेला बळ मिळाल्याचं आबिटकर म्हणाले.

Rahul Gadkar

Kolhapur News, 21 Dec : कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेने पहिल्यांदाच मंत्रिपद दिले आहे. राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिल्यामुले आता जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळ मिळाले आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात आल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) मागील नेतृत्वाबाबत खंत व्यक्त केली. जिल्ह्याने सहा आमदार देऊन देखील काही मिळालं नव्हतं. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याला पहिल्यांदाच मंत्रीपद दिल्याने शिवसेनेला बळ मिळाल्याचं आबिटकर म्हणाले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आशीर्वादामुळेच कोल्हापुरात शिवसेनेला पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं. सहा आमदार असताना देखील कोल्हापूरला मंत्रिपद मिळाला नाही. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. मला चांगली संधी मिळाली आहे. या संधीच सोन करण्याची जबाबदारी माझी आहे. कोल्हापुरकरांनी शिवसेनेला भरभरून दिलं आहे.

सहा आमदार आणि दोन खासदार दिले आहेत. त्या तुलनेने कोल्हापूरला (Kolhapur) शिवसेनेने काहीच दिलं नाही. अशा शब्दात मंत्री प्रकाश आबिटकर यांनी खंत व्यक्त करत माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरला मंत्रिपद दिलं. यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिकांना अधिक बळ मिळालं आहे.

तसंच काळम्मावाडी धरणा संदर्भातील काम करण्यासाठी टेंडर फायनल झालेलं आहे. काही त्रुटी आहेत त्या आज अधिकाऱ्यांना भेटून पूर्ण केल्या जातील. धरणातील गाळ काढण्याचं काम जलद गतीने केले जाईल त्याची जबाबदारी मंत्री म्हणून आमची असेल, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, पालकमंत्रिपदाबाबत बोलताना पक्षाचे तिन्ही नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शक्तीपीठ महामार्ग आपल्या जिल्ह्यातून देखील व्हावा यासाठी धावपळ करणारा मी होतो.

मात्र, आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान होतंय शेतकर्‍यांचा विरोध होतोय, त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली. विकास होत असताना आपल्या माणसाचं नुकसान होऊ नये याची जबाबदारी घेण्याचं काम लोकप्रतिनिधींचा आहे. त्यामुळेच कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला आहे, असं स्पष्टीकरण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT