
Terror Attack On Christmas Market : ख्रिसमस सणाला अवघे चार दिवस उरले असतानाच या सणाच्या खरेदीसाठी जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस (Christmas) मार्केटमध्ये गेलेल्या लोकांवर काळाने घाला घातला आहे. या मार्केटमध्ये खरेदीसाठी गेलेल्या लोकांना एका भरधाव कारने चिरडलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात जाणूनबुजून करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. कारने (Accident) केलेल्या या हल्ल्यात एका चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 60 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तर ख्रिसमस मार्केटमध्ये झालेली दुर्घटना ह अपघात नसून, तो ठरवून केलेला हल्ला असल्याचा संशय जर्मन पोलिसांनी (German police) व्यक्त केला आहे. या हल्लेखोर कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला चालकाने एकट्याने केला असून त्याला अटक केल्यामुळे शहराला आता कोणताही धोका नसल्याचं सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्याचे पंतप्रधान रेनर हॅसेलॉफ यांनी सांगितलं आहे.
ख्रिसमस मार्केट ही जर्मनीतील अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. दरवर्षी लाखो लोक ख्रिसमच्या खरेदीसाठी या ठिकाणी जात असतात. अशीच गर्दी यामार्केटमध्ये यंदाही नागरिकांकडून करण्यात आली होती. अशातच शुक्रवारी सायंकाळी या मार्केटमध्ये एका व्यक्तीने भरधार कार घातली आणि लोकांवर हल्ला केला.
कार हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव डॉ. तालेब ए. असं असून तो मानसोपचारतज्ञ आहे. 2006 पासून जर्मनीत राहणाऱ्या सौदीच्या तालेब याला 2016 मध्ये त्याला निर्वासिताचा दर्जा मिळाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथील ख्रिसमस मार्केटमध्ये खरदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी केली होती.
लोक खरेदी करण्यात व्यस्त असताना अचानक एक भरधाव कार या मार्केटमध्ये शिरली. या कारने अनेकांना धडक दिली. या कारच्या धडकेत लहान चिमुरड्यासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरारक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.