Sangli Kolhapur Mahayuti Politics : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता येणार आणि कोण अध्यक्ष होणार याची उत्सुकता आणि उत्कंठा दोन्ही जिल्हावासियांना लागली आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसले तरी महायुतीचं काठावरचे बहुमत आहे. तर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महायुती बहुमतात असली तरी सर्वाधिक सदस्य हे राष्ट्रवादीचे आहेत.
सांगलीमध्ये भाजपला बाजूला ठेवून अध्यक्ष करण्याच्या हालचाली महायुतीच्या गोटात सुरू आहेत. कोल्हापुरात सुरुवातीला राष्ट्रवादीला बाजूला ठेवून प्रथम भाजपचा अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच डाव प्रतिडाव टाकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला राष्ट्रवादीला पहिले अध्यक्ष पद हवे आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचाच फॉर्म्युला जिल्हा परिषदेला असताना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष होणार असं म्हणत गुगली टाकली आहे. तोच धागा पकडून उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्षपदावर भाजपचाच दावा सांगितला आहे.
जिल्हा परिषदेवर अध्यक्ष व्हावा, असा आमचा आग्रह आहे. मात्र, मंत्री हसन मुश्रीफ हे आमचे 20, तुमचे 12 मग तुमचा अध्यक्ष कसा? असे म्हणत असले तरी जनसुराज्य व भाजप हे शरीराने वेगळे असले तरी आमच्या दोन्ही पक्षांचा आत्मा एकच आहे. आमचे 12 व जनसुराज्यचे 6 असे मिळून आमचे सदस्य 18 होतात. त्यामुळे 18 आणि 20 यात फार फरक पडत नसल्याने जिल्हा परिषदेत पहिला अध्यक्ष भाजपचा व्हावा, असा दावा मंत्री पाटील यांनी केला आहे.
भाजपच्या या आग्रहानंतर मात्र महायुतीमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. संख्याबळ ज्याचे जास्त त्याचा सुरुवातीला अध्यक्ष हे सूत्र असताना ही मागणी करण्यामागे भाजपमध्ये कोणाचा अट्टहास आहे. याची चर्चा जोरात सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील महानगरपालिकेच्या राजकारणात मोठा बॉम्ब फोडून महापौर पदाचीच मागणी केली आहे.
जर जिल्हा परिषदेमध्ये सर्वांना अध्यक्षपद हवे असेल तर, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आम्हाला महापौर पद द्या अशी थेट मागणी केली आहे. सुरुवातीला महायुतीमधील शिवसेना आणि भाजप ह्याला नकार दर्शवत असले तरी स्थायी समिती आणि परिवहन पदावर राष्ट्रवादीला संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.