Uddhav Thackeray, Viraj Patil, Ravikiran Ingavale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur: कोल्हापूरसाठी उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन तयार : रविकिरण इंगवलेंच्या राजीनाम्यानंतर जिल्हाप्रमुखपदासाठी शोधला ताकदीचा चेहरा

Kolhapur Shiv Sena, Viraj Patil, Uddhav Thackeray: रविकिरण इंगवले यांच्या राजीनाम्यानंतर करवीरचे तालुकाप्रमुख विराज पाटील यांची कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ठाकरे गटातील अंतर्गत कलह मिटवून संघटन मजबूत करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Shiv Sena: कोल्हापुरातील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रविकिरण इंगवले यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागी कोणत्या नावावर शिक्कामोर्तब केला जाणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिलं होते. मात्र रात्री उशिरा करवीरचे तालुकाप्रमुख विराज पाटील यांच्या नावासमोर कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले. ठाकरेंच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून सामना मधून हे नाव प्रसिद्ध करण्यात आले आहे.

कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत कलहामुळे राजकारण तापले होते. शह कटशहाचे राजकारणामुळे राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेची बदनामी होत होती. कोल्हापुरातील ठाकरे शिवसेनेत पडलेले दोन गट आणि त्यातून निर्माण होणारे वाद विवाद यामुळे वरिष्ठ पदाधिकारी देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराज होते. अशातच रविकिरण इंगवले यांनी तडका फडकी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती.

त्यामुळे नव्याने निवड होणाऱ्या जिल्हाप्रमुख पदावर करवीरचे तालुकाप्रमुख विराज पाटील, राजू यादव, अवधूत साळुंखे इच्छुक होते. अखेर रात्री विराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विराज पाटील यांनी नुकतीच पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढवली होती. शिवाय ते शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह रोखने हेच मोठे आव्हान विराज पाटील यांच्यासमोर असणार आहे.

शुक्रवारी होणार होता निर्णय

दरम्यान सर्वांना विचारात घेऊन कोल्हापूर जिल्हाप्रमुख निवडीची प्रक्रिया शुक्रवारी होणार होती. त्यासाठी सर्वांना मुंबईत बोलावल्याची माहिती होती. मात्र मंगळवारी (३० जून) रात्री उशिरा त्यावर निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT