Shivsena UBT: पहिल्याच पत्रकार परिषदेत नवे जिल्हाप्रमुख इंगवलेंचा थेट पालकमंत्र्यांवर वार, जुगार, मटकेवाले मुख्यमंत्र्यांना..?

Ravikran Ingawale News: कोल्हापुरातही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा भडका उडाला असून ज्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेत फूट पडली अन् संजय पवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच संजय पवारांनी आता तडकाफडकी आपल्या शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
Ravikiran Ingawale On Prakash Abitkar
Ravikiran Ingawale On Prakash AbitkarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर, नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली त्या रवीकिरण इंगवले (Ravikiran Ingawale) यांनी बुधवारी (ता.2 जुलै) पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे.

माझी निवड वरिष्ठांनी पूर्ण विचारांती केली आहे. संजय पवार यांना माझे आवाहन आहे. तुम्ही नाराज न होता आम्हाला मार्गदर्शन करा. मी तुमचे मार्गदर्शन स्वीकारतो, अशा शब्दांत जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आम्हाला शहरात शिवसेना (Shivsena) पक्षाला गतवैभव मिळवून द्यायचं आहे. यापुढे पक्षात मतभेद न ठेवता पक्ष वाढवायचा आहे. पक्ष मोठा असतो, सत्तेत असतो तेव्हा कार्यकर्ते हवसे नवसे येत असतात.माझे सगळे जवळचे नातेवाईक शिंदे सेनेत आहेत. पक्ष फुटीनंतर मला ही ऑफर इतर पक्षाकडून आली. मात्र ठाकरेंना सोडून जाण्याचा विचार मी कधी केला नाही. जिल्ह्यातील ठाकरे गट कोणाचाही दावणीला बांधू देणार नाही, असे रविकिरण इंगवले म्हणाले.

नाराजी नाट्य अजून कदाचित संपलेलं नाही असं वाटतंय. पण आज वरिष्ठांशी बोलणी आणि भेट झाल्यानंतर ही नाराजी दूर होईल.आम्ही एकदिलाने यापुढे एकत्र दिसणार असल्याचे इंगवले म्हणाले.

Ravikiran Ingawale On Prakash Abitkar
Supriya Sule BJP Alliance : सुप्रिया सुळे हुशार; मंत्री आठवलेंनी महायुतीसाठी मागितली टाळी, प्रतिसाद मिळणार का?

जुगार अड्डे चालवणारे आता जिल्ह्याचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसत आहेत. आशा लेव्हलची भरती गद्दार सेनेत सुरू आहे. भविष्यात गद्दारसेना शिल्लक राहणार नाही कारण भाजपच त्यांना गिळंकृत करणार आहे. पालकमंत्रीसाहेब, तुमच्यासोबत चक्क जुगार अड्डावाला फिरत आहे. याची चौकशी करणार आहात का? असा सवालही रविकिरण इंगवले यांनी उपस्थित केला आहे.

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले.याचमुळे स्थानिक पातळीवर पदाधिकार्‍यांच्या नाराजीनं डोकं वर काढल्यामुळे राजकीय पक्षांसमोर पेच निर्माण होत आहे.

Ravikiran Ingawale On Prakash Abitkar
Imtiaz Jaleel News : छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेत शंभर कोटींचा घोटाळा! इम्तियाज जलील यांनी बाॅम्बची वात पेटवली..

अशातच आता कोल्हापुरातही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा भडका उडाला असून ज्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेत फूट पडली अन् संजय पवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच संजय पवारांनी आता तडकाफडकी आपल्या शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com