Kolhapur Municipal Corporation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : शिवसेनेच्या सुनील कदमांना स्वतःच्या मुलासह भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीने तोंडावर पाडलं : सभागृहात ऐनवेळी बदलली भूमिका

Sunil Modi News : महायुतीने सुनील मोदी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड मान्य केली. मात्र शिवसेनेत अंतर्गत मतभेद उफाळले. सुनील कदम यांनी विरोध केला तर त्यांच्या मुलाने सभागृहात समर्थन दिले.

Rahul Gadkar

Mahayuti Political News : कोल्हापूर महापालिकेमध्ये शुक्रवारी (20 फेब्रुवारी) स्वीकृत नगरसेवकांची निवड पार पडली. यात काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवकांसाठी निवड होणाऱ्या 2 पदाधिकाऱ्यांना महायुतीच्या नेत्यांकडून विरोध होता. त्यासंदर्भात शिवसेनेचे नेते सुनील कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनील मोदी आणि मुस्ताक मलबारी यांना स्वीकृत नगरसेवक करू नये अशी मागणी केली होती. मात्र महायुतीच्या सभागृहातील नगरसेवकांनी या दोघांच्याही नावाला स्वीकृत सदस्य म्हणून सहमती दिली. त्यामुळे कदम यांना महायुतीतीलच तिन्ही पक्षांनी तोंडावर पाडल्याच चित्र आहे.

स्वीकृत नगरसेवकासाठी काँग्रेसकडून दिलेल्या सुनील मोदी यांच्या नावाला सत्ताधारी शिवसेनेचे नेते सुनील कदम यांच्याकडून विरोध केला होता. आज (ता.20) सकाळपासून महापालिका सभेत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता होती. महायुतीचे सर्व नगरसेवक आज होणाऱ्या सभेत मोदी यांच्याबद्दल काय भूमिका घेणार याची रणनीती महायुतीच्या सकाळी होणाऱ्या पार्टी मिटींगमध्ये ठरवली जाणार होती. सुनील कदम हे सभागृहातील सदस्य नसल्याने त्यांनी बाहेर पत्रकार परिषद घेत विरोध केला.

यापूर्वीच्या सभागृहात भाजप-ताराराणी आघाडीकडून सुनील कदम यांचे नाव स्वीकृतसाठी आले होते. त्यावेळी काँग्रेस आघाडीने विरोध केला होता. आता काँग्रेस आघाडीकडून स्वीकृतसाठी येणाऱ्या सुनील मोदी यांच्यासाठी महायुतीकडून विरोध केला जाईल, असे दिसत होते. मात्र महायुतीनेच सकाळी महापालिकेत झालेल्या बैठकीत नांगी टाकली. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार कोणीही कोणाला विरोध करायचा नाही, असे आदेश दिल्यानंतर सर्वांनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या स्वीकृत सदस्य निवडीला मान्यता दिली.

स्वतःचा मुलगाही वडिलांच्या भूमिकेच्या विरोधात

सुनील मोदी यांना विरोध करणाऱ्या सुनील कदम यांचे चिरंजीव हे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. 11 वाजण्याच्या सुमारास सुनील कदम यांनी महापालिकेच्या चौकात पत्रकार परिषद घेत विरोध केला. तर सभागृहात चिरंजीव स्वरूप कदम यांनी सर्व स्वीकृत नगरसेवकांना बेंच वाजवून सहमती दिली.

याचवेळी दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला. सुनील मोदी हे काँग्रेसच्या कोट्यातून नगरसेवक झाल्यानंतर शिवसैनिकांनी मोदी यांच्या घरासमोर जाऊन राडा घालत जाब विचारला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT