Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेत ऑडियो बॉम्ब फुटला; भ्रष्टाचाराचा आरोप करत दोघांना स्वीकृतसाठी विरोध

Kolhapur audio bomb controversy : कोल्हापूर महापालिकेत ठाकरे गटाचे नेते आणि शहर प्रमुख सुनील मोदी आणि काँग्रेसचे मुस्ताक मलबारी यांच्या स्वीकृत नगरसेवकनेमणुकीला विरोध केला असून मोदी यांनी भ्रष्ट्राचार तर मलबारी यांनी महापालिकेचे पैसे थकवाल्याचा आरोप मोदी यांनी केला आहे.
Kolhapur Municipal Corporation building where the alleged audio bomb controversy over nominated corporators sparked political tension.
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 20 Feb : कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्याच जनरल सभेत ऑडियो बॉम्ब फुटला आहे. महापालिकेत काँग्रेसच्या दोन स्वीकृत नगरसेवक नेमणुकीवर शिवसेना नेते सुनील कदम यांनी आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि शहर प्रमुख सुनील मोदी आणि काँग्रेसचे मुस्ताक मलबारी यांच्या नावाला विरोध केला असून मोदी यांनी भ्रष्ट्राचार तर मलबारी यांनी महापालिकेचे पैसे थकवाल्याचा आरोप केला आहे.

HCL नावाच्या कंपनीला कोल्हापुरात आणताना सुनील मोदी यांनी भ्रष्टाचार केला असून टीडीआर घोटाळ्यात मोदीचा सहभाग असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसचे मुस्ताक मलबारी हे महानगरपालिकेचे थकबाकीदार असल्याचा देखील आरोप केला आहे. शिवसेना नेते सुनील कदम यांनी महापौर रूपाराणी निकम यांना लेखी निवेदन दिले असून त्यांना स्वीकृत नगरसेवक करू नये अशी मागणी केली आहे.

शिवाय ही मागणी मान्य न केल्यास न्यायलयीन लढाई लढण्याचा इशारा सुनील कदम यांनी दिला आहे. दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, महानगरपालिकेच्या आज होणाऱ्या पहिल्या महासभेमध्ये स्वीकृत सदस्य नेमणूकीकरीता ८ व्यक्तीची शिफारस महानगरपालिकेस केली आहे. सदर विषय आजच्या महासभेपुढे आहे. शिफारस केलेल्या ८ व्यक्तींपैकी ३ सदस्य काँग्रेसकडून केली जाणार आहे. त्यामध्ये शिफारस केलेल्या व्यक्तींपैकी मोदी सुनिल जबरचंद व मलबारी मुस्ताक मुस्सा या दोन व्यक्तिबाबत माझी हरकत आहे. सदर व्यक्ति नामनिर्देशित सदस्य म्हणून अपात्र आहेत.

सदर व्यक्तिपैकी मलबारी मुस्ताक मुसा यांनी ज्या अशासकिय संघटनेच्या पदाधिकारी म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तो सुन्नत जमातुल्ला मुस्लीमीन अरबी मदरसा राजेंद्र नगर कोल्हापूर ही समाजधिष्टीत अशासकिय संघटना नाही. ती धार्मिक शिक्षण देणारी एक विशिष्ट समाजाची संघटना आहे. या कारणे श्री मलबारी हे नामनिर्देशित सदस्य होऊ शकत नाहीत.

Kolhapur Municipal Corporation building where the alleged audio bomb controversy over nominated corporators sparked political tension.
Chhagan Bhujbal : रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर छगन भुजबळांची फटकेबाजी; 'तिरकस' प्रश्नाने राष्ट्रवादीतील संघर्ष पेटणार?

तसेच सदर संघटनेने राजेंदनगर येथे बांधलेली मदरसा इमारत सरकारी जागेवर विनापरवाना व बेकायदेशीर बांधलेली आहे. ज्या संघटनेने महारगरपालिकेमध्ये बेकायदेशीर बांधकाम केले. त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यास पालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्य होता येणार आहे. तसेच मलबारी यांचे पत्नीचे नावे पालिकेच्या हद्दीमध्ये होर्डिंग असून त्यांचा पालिकेच्या व्यवसायाबाबत ही संबंध आहे.

तसेच त्यांनी कोमनपा विरुध्द दिवान न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. सदर फर्मचे नाव अयान अडव्र्व्हटायझिंग व मार्केटिंग असे असून सदर फर्मन ११७३ ई वॉर्ड टेबलाई नाक येथे अनाधिकृत होर्डिंग उभे केले आहे. अशा व्यक्तिस महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशत सदस्य कायद्याने नियमाने होता येणार नाही, करिता सदरच्या महासभेपुढे मलबारी मुस्ताक मुसा यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून सदरची केलेली शिफारस अमान्य करणेत यावी ही विनंती आहे.

Kolhapur Municipal Corporation building where the alleged audio bomb controversy over nominated corporators sparked political tension.
Shivsena UBT On AI summit : 'त्याची खंत भक्तांना आहे, ना मोदींना...; परंतु गलगोटियाच्या बनावटगिरीने जगभरात भारताची 'छीथू' झाली त्याचे काय?'

शिफारस केलेल्या दुसरी व्यक्ति सुनिल मोदी जबरचंद हे देखील नामनिर्देशित सदस्य म्हणून पात्र नाहीत. मोदी यांनी यापुर्वी महानगरपालिकेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करीत असताना अनेक आर्थिक व्यवहारामध्ये महानगरपालिकेच्या व शहरातील नागरिकांच्या हितास बाधा येईल असे अनेक निर्णय घेतले आहेत. विशेषता नागरी सुविधा केंद्राकरिता एच.सी.एल. या कंपनीस कंत्राट देत असताना स्वताचे आर्थिक लाभासाठी महानगरपालिका व शहरातील नागरिकांचे आर्थिक नुकसान केले आहे.

त्याबाबत आर्थिक व्यवहाराबाबतच्या तत्कालिन ऑडिओ क्लिप समाजमाधमांमध्ये प्रसिध्द झालेले आहेत. सदर बाब महानगरपालिकेच्या दृष्टीने बदनामी करणाऱ्या आहेत. अशा व्यक्तिस महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणे संयुक्तिक होणार नाही. व करिता महासभेपुढे मोदी सुनिल जबरचंद यांची नामनिर्देशन सदस्य म्हणून केलेली शिफारस अमान्य करणेत यावी ही विनंती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com