Kolhapur district collector meeting sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur traffic jam issue : वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर अखेर कोल्हापूर प्रशासन ॲक्शन मोडवर!

Kolhapur district collector meeting - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख, आयुक्त यांच्या समवेत बैठक घेत, थेट कारवाईसह उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Rahul Gadkar

Kolahpur News - कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर कोल्हापुरातील रुग्णालयात येणाऱ्या रुग्णवाहिकांना देखील या वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागत आहे. त्यावर 'सरकारनामा'ने "पालकमंत्रीसाहेब आरोग्यमंत्र्यांच्या रुग्णवाहिकेला वाट द्या, रोज काय घडतंय कोल्हापूरात?" अशी बातमी प्रकाशित केली होती.

सरकारनामाच्या या दणक्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. कारण वाहतूक कोंडीच्या समस्यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख, आयुक्त यांच्या समवेत बैठक घेत, थेट कारवाईसह उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासह परिवहन विभाग, वाहतूक विभाग, महापालिका, सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर शहरात वाढत्या वाहतुकीच्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिक्रमण हटविणे, नवीन पार्किंगची सोय करणे, झेब्रा क्रॉसिंग, रोड मार्किंग, ट्रॅफिक वॉर्डन नियुक्ती, विविध दिशा दर्शक फलक अशा विविध उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित विभागांना दिल्या.

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील स्टॅन्ड बोर्ड, छपरी, पायऱ्या, दुकानांपुढील अतिक्रमण तत्काळ काढावे. झेब्रा क्रॉसिंग व रोड साईड पट्टे स्पष्ट करावेत. सिग्नल चौकांवर दिशादर्शक व माहिती फलक लावावेत. शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुट्टीच्या काळात मेन राजाराम हायस्कूल, पेटाळा मैदान, प्रायव्हेट हायस्कूल मैदान व खराडे महाविद्यालय या ठिकाणी ‘पे अँड पार्क’ तत्वावर खासगी पार्किंग सुरु करण्याचे निर्देश दिले. याबाबत शाळांशी बोलून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

वाहतुकीस अडथळा ठरणारे इलेक्ट्रिक पोल आणि डीपी तातडीने स्थलांतरित करावेत. खुदाई करण्यापूर्वी वाहतूक विभागाची व पोलिस विभागाची परवानगी घेणे बंधनकारक करावे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याकरीता ट्रॅफिक वॉर्डन नेमावेत अशी सूचना करण्यात आली.

पर्यटकांच्या वाहनाकरीता नव्याने पार्कींग सुरु करणे. तावडे हॉटेल येथील बस स्टॉपची जागा बदलणे, तेथील इलेक्ट्रिक पोल शिफ्ट करणे व सिग्नल सुरु करणे. तावडे हॉटेल येथे वारंवार वाहतुक कोंडी होते त्याठिकाणच्या रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुसूत्र होईल आणि याबाबत पुढील आठ दिवसात कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. ज्या ठिकाणी नव्याने बदल तसेच सुविधा निर्माण केल्या जात आहेत याविषयक चांगली प्रसिद्धी करून मोहीम स्वरुपात अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT