
Devendra Fadnavis Participates in Palkhi Procession - आपल्या लाडक्या विठूरायाच्या भेटीसाठी आता वारकऱ्यांची पावलं आषाढी वारीनिमित्त संतांच्या पालख्यांसह पंढरीकडे वळू लागली आहेत. हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण निर्माण होताना दिसत आहे. टाळ, मृदंग घेत आणि मुखी विठू नामाचा जयघोष करत लाखो वारकरी पंढीरीच्या विठूरायाच्या दर्शनासाठी आतूर झाले आहेत.
महाराष्ट्रभरातून मानाच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान होण्यासही सुरूवात झाली आहे. बुधवारी देहू येथूनही संत तुकाराम महाराजांच्या पालखीने विठूरायाच्या पंढरीस जाण्यासाठी प्रस्थान केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याप्रसंगी वारकरी वेशात हजर राहून आणि वारकऱ्यांसोबत टाळ, मृदंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष केला. तसेच, तुकोबारायांच्या पालखीतील पादुकांचे पूजनही केले. यानंतर पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. याप्रसंगी अवघी देहू नगरी विठूनामाच्या जयघोषात दुमदुमून गेली होती. शेकडो वारकऱ्यांनी गर्दी केली होती.
देहू येथे संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला आतापर्यंत 1995 मध्ये नारायण राणे हेच मुख्यमंत्री असताना आले होते, त्यानंतर आज देवेंद्र फडवणीस हे दुसरे मुख्यमंत्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला आल्याचे संस्थानचे माजी विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी सांगितले आहे.
वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महापर्व असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा एक आगळावेगळा आणि उत्साहवर्धक क्षण अनुभवायला मिळाला.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत वारकऱ्यांमध्ये मिसळून, भक्तिभावाने फुगडी खेळत उपस्थितांचे मन जिंकले.
पुण्यात पार पडलेल्या या सोहळ्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, मावळचे आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे हे देखील उपस्थित होते.
या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 339वे वर्ष असून, लाखो वारकरी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी पदयात्रा करत आहेत. यावेळी फडणवीस यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला., “वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, तर ती महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याची शान आहे,” असे सांगत संतपरंपरेतून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.