Kolhapur News: जागा वाटपावरून रखडलेली ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या आघाडीने संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या चर्चेनंतर गती घेतली. बुधवारी त्या संदर्भात स्वतः आघाडी झाल्याची घोषणा केली. त्याला 24 तास ही उलटून गेले नसताना गुरुवारी (ता.25) दिवसभरात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सेनेत शिवसैनिक आणि नेत्यांमध्ये घमासान झाले.
शिवसेनेच्या वाट्याला सध्या तरी सात जागांवर एकमत झाले असले तरी त्यांकडून दोन अंकी जागांचा प्रस्ताव मान्य होणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्ष सातच किंवा सहा जागा मिळत असल्याची कुणकुण लागल्याने शिवसैनिकांनी थेट नेत्यांनाच जाब विचारायला सुरुवात केली. दिवसभरात शिवसैनिकांनी घातलेल्या गोंधळामुळे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) 33 जागांवर दावा केला जात आहे. मात्र, काँग्रेसकडून जिंकून येणाऱ्या जागांवरच जागा वाटपाचे सूत्र ठरवल्यानंतर ठाकरेंच्या सेनेला केवळ आघाडीत सातच जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आणि काँग्रेसनेते आमदार सतेज पाटील यांच्यात चर्चा झाल्यानंतर त्यामध्ये मार्ग निघाल्याचा दावा पत्रकार परिषदेतून करण्यात आला.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 12 जागांसह एका स्वीकृत जागेचा प्रस्ताव देण्यात असल्याचा दावा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडून करण्यात आला. सध्या ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये सात जागांवर एक मत झाले असून उर्वरित जागांची चर्चा सुरू असल्याचे देखील सांगण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे सेना ही महाविकास आघाडी म्हणून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असेल अशी घोषणा देखील करण्यात आली.
ही घोषणा झाल्यानंतर 24 तासातच ठाकरेंच्या सेनेतील पदाधिकाऱ्यांचा असंतोष पाहायला मिळाला. जर बारा जागांचा फॉर्मुला ठरला आहे तर उर्वरित पाच जागा संदर्भात घोषणा का केली जात नाही. शिवाय चर्चेचा गुऱ्हाळ का सांगितलं जातं? हा मुद्दा घेऊन ठाकरे सेनेतील इच्छुक उमेदवारांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना चांगलाच घाम फोडला.
जर बारा जागा निश्चित झाल्या असतील तर आम्हाला उमेदवारीचा शब्द द्यावा, अशी मागणी केली.तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी गेल्या वीस ते पंचवीस वर्षात काय केलं? याचा लेखाजोगा सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रमुख नेत्यांसमोर मांडला.
काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या या आघाडीत ठाकरे सेनेला केवळ सातच जागा मिळत असल्याची कुणकुण या पदाधिकाऱ्यांना लागल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी चांगलाच रोष व्यक्त केला. ठाकरे सेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह शहरातील दुसऱ्या फळीतील पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी उमेदवारीबाबत थेट नेत्यांनाच आव्हान दिले. ठाकरे सेनेतून आम्हाला उमेदवारी मिळाली तर ठीक मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव अन्य करून आम्हाला उमेदवारी द्यावी. अपक्ष म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात आसनात असा थेट इशारा प्रमुख नेत्यांना दिला आहे.
मात्र, शिवसैनिकांचा वाढता रोष पाहून नेत्यांनीच आज डोक्याला हात लावून त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. मात्र शिवसैनिकांच्या रोषापुढे आणि काँग्रेसच्या दबावा पुढे प्रमुख पदाधिकारीच हतबल झाल्याचे चित्र शिवसैनिकांना पहायला मिळाले. केवळ निवडणुकीची घोषणा होतानाच आम्ही तयारी केली नाही तर गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आम्ही भागात सामाजिक कार्य करत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवत आहे. मात्र अशा परिस्थितीत मला उमेदवारीतून डावलत असेल तर आम्ही अपक्ष लढू असा इशारा देखील सहा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, आघाडीच्या उमेदवारांसोबत आमची उमेदवारी जाहीर नाही झाली तर आम्ही अपक्ष म्हणून रिंगणात असणार असा इशारा देखील या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी नेत्यांना दिला आहे.
दरम्यान, या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निकाला आधीच ठाकरेंच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून पदाचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न सुरू होता. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पद, तर काहींना शिक्षण आणि महिला बालकल्याण विभागात समितीचे पद देण्याचे आश्वासन देण्याचा प्रयत्न सुरू होता.
दरम्यान शिवसैनिकांचा संताप पाहून अधिकच्या जागावाटपास संदर्भात आज काँग्रेसला ठाकरे सेनेच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अल्टिमेटम दिला आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे. अन्यथा काही इच्छुक शिवसैनिक अपक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.