Political leaders campaign intensively in Shahuwadi as MLA Vinay Kore and former MLA Satyajit Patil prepare for a high-stakes triangular battle in the Zilla Parishad and Panchayat Samiti elections. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur ZP : शाहूवाडीत विनय कोरे ताकद लावणार; विजयाचा वारू रोखण्यासाठी माजी आमदार पाटलांनी कंबर कसली : भाजपच्या घोषणेने ट्विस्ट

Zilla Parishad Election :शाहूवाडी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यातील प्रतिष्ठेची तिरंगी लढत रंगणार असून भाजपच्या प्रवेशामुळे समीकरणे बदलली आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur Politics : शाहूवाडी तालुक्यात जनसुराज्यचे आमदार विनय कोरे आणि काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड यांच्या आघाडीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सत्यजित पाटील आणि रणवीर गायकवाड यांची आघाडी असा दुरंगी सामना होणार अशी शक्यता होती. त्याचवेळी भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली असल्याने आता तिरंगी लढत स्पष्ट झाली आहे.

इच्छुकांची भाऊगर्दी व गट आणि गणांतील आरक्षणांमुळे सक्षम उमेदवारी देताना सर्वच नेत्यांची दमछाक झाली आहे. शाम पाटील आमदार कोरे, माजी आमदार पाटील, जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड, गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड, भाजपचे प्रदेश सदस्य आबासाहेब पाटील यांची प्रतिष्ठा यावेळी पणाला लागली आहे.

2012 व 2017 च्या निवडणुकीत माजी आमदार पाटील यांचा वरचष्मा कायम राहिला. आमदार कोरे यांना या दोन्ही निवडणुकांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 1 किंवा 2 जागांवरच समाधान मानावे लागले होते. मात्र, तिसऱ्यांदा आमदारकी मिळवत विकासकामांच्या जोरावर विरोधी आघाडीमधील कार्यकर्ते आपल्या गोटात खेचणारे आमदार कोरे यावेळी सत्तापरिवर्तन घडवून नारळाची बाग फुलवणार की, माजी आमदार पाटील आपले वर्चस्व कायम ठेवत मशाल अधिकच तेजोमय करणार हे निकालानंतर कळणार आहे.

लोकसभा व विधानसभेला माजी आमदार पाटील यांना अपयश आले. विधानसभेत ते सलग दुसऱ्यांदा पराभूत झाले. त्यामुळे शाहूवाडीच्या राजकीय पटलावर पुन्हा उभारी घ्यायची असेल, कार्यकर्त्यांना बळ द्यायचे असेल, तर सध्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना आर या पारची लढाई करावी लागणार आहे. त्यादृष्टीने ते सावधपणे व्यूहरचना करत आहेत.

मलकापूर नगरपालिकेत जनसुराज्याने एकहाती सत्ता घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगले यश मिळाले; पण भाजप, राष्ट्रवादीची मोठी पडझड झाली. या निवडणुकीतील हे संदर्भही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत परिणाम करणार आहेत. सत्यजित पाटील यांचा बालेकिल्ला असलेला सरूड जिल्हा परिषद गट यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. येथील वचर्स्वासाठी पाटील प्रयत्नशील आहे, तर या बालेकिल्याला खिंडार पाडण्यासाठी आमदार कोरे मोर्चेबांधणी करत आहे.

2017 मध्ये आमदार विनय कोरे आघाडीच्या नवख्या तरुण उमेदवाराने येथून चांगले मतदान घेतले होते. सरूड अंतर्गतचे सरूड व भेडसगाव पंचायत समिती हे दोन्ही गण महिला राखीव झाल्याने येथे इच्छुकांची गर्दी आहे. बांबवडे जिल्हा परिषद गटावर गायकवाड घराण्याचे वर्चस्व आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण झाल्याने इच्छुकांत नाराजी आहे. हा गट आपल्याकडे ठेवण्यासाठी रणवीर गायकवाड कामाला लागले आहेत. कर्णसिंह गायकवाड यांनीही उमेदवार देऊन तयारी केली आहे. कोणता गायकवाड गट बाजी मारणार हे नंतरच स्पष्ट होणार आहे. शित्तूर वारूण जिल्हा परिषद गट खुला झाल्यामुळे आमदार कोरे आघाडीच्या सोयीचा झाला आहे.

माजी आमदार पाटील यांची आघाडीने तुल्यबळ उमेदवार देऊन व्यूहरचना आखाली आहे. या गटातील शित्तूर वारूण व येलूर गणात इच्छुकांची संख्या अधिक आहे. कडवे या मोठ्या गावातील उमेदवार देण्यासाठी नेत्यांचा भर आहे. यावेळी आरक्षणांमुळे अनेक ठिकाणी जुन्या मात्तबर, अभ्यासू उमेदवारांची संधी हुकली आहे. नव्या चेहऱ्यांना मात्र बहुतांश ठिकाणी संधी मिळणार हे निश्चित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT