Sangli Politics : सांगलीत भाजप 'राष्ट्रवादी' चा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत, शरद पवारांच्या पक्षाचे नगरसेवक फोडण्याच्या तयारीत

Sangli BJP News : सांगली महापालिकेत भाजप बहुमतापासून एक जागा दूर असून, सत्ता स्थापनेसाठी शरद पवार गटातील नगरसेवकांना सोबत घेण्याच्या हालचालींमुळे राजकीय समीकरणे तापली आहेत.
BJP leaders strategizing in Sangli after municipal election results, as talks intensify with NCP Sharad Pawar group corporators to secure majority and form the civic body.
BJP leaders strategizing in Sangli after municipal election results, as talks intensify with NCP Sharad Pawar group corporators to secure majority and form the civic body.Sarkarnama
Published on
Updated on

Sangli Municipal Corporation : सांगली महानगरपालिकेत भाजपने घवघवीत यश मिळाल्यानंतरही एकाच जागेने सत्तेपासून दूर आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक महायुतीतील घटक पक्षाने स्वतंत्रपणे लढवल्यानंतर भाजपला 39 राष्ट्रवादी काँग्रेसला 16 तर शिवसेनेला अवघ्या दोन जागा मिळाल्यानंतर भाजपने स्वतंत्र सत्ता स्थापनेसाठी दावा केला आहे.

मात्र बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता असल्याने महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसलाच बाजूला करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनाच गळ घालण्याची प्रयत्न सुरू केले आहेत. सत्तेसाठी एका जागेची गरज असल्याने त्यांनी त्यांनी शरद पवार गटाच्या एका नगरसेवकाला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

सत्तेसाठी एका जागेची कमी असल्याने भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवण्याची प्रयत्न सुरू आहेत. महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याऐवजी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपने एक हाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. त्याप्रमाणे भाजपला अपेक्षित यश मिळाले मात्र सत्तेपासून एका जागेची कमी ठेवली.

BJP leaders strategizing in Sangli after municipal election results, as talks intensify with NCP Sharad Pawar group corporators to secure majority and form the civic body.
Sangli Politics : विश्वजीत कदमांनी पुन्हा दणका देताच 'देशमुख बंधूंचे' 'पॅचअप'; बड्या नेत्याने लक्ष घातलाच विमान जमिनीवर

त्यामुळे भाजपने आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नगरसेवक अभिजीत कोळी यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. कोळी हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जाते. मात्र कोळी यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चर्चेशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे अन्य दोन नगरसेवकांसोबत देखील चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते.

BJP leaders strategizing in Sangli after municipal election results, as talks intensify with NCP Sharad Pawar group corporators to secure majority and form the civic body.
Sangli ZP : सांगलीत जिल्हा परिषदेत महायुतीचा पेपर सोपा, महविकासचं मताधिक्य घटल्याने टेन्शन वाढलं

सांगली महापालिकेतील पक्षीय बलाबल

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत 20 प्रभागांमध्ये 78 जागांसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. सर्वाधिक 39 उमेदवार निवडून आले आहेत. तर काँग्रेसचे 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 उमेदवार निवडून आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अवघ्या 2 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com