Rajendra Patil Yadravkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur ZP : यड्रावकरांनी बॉम्ब फोडला! 'जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचा असावा'; निर्णायक मतामुळे क्रेडिट वाढले!

ZP President Rajendra Patil Yadravkar : जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दिला होता.

Rahul Gadkar

Kolhapur ZP News: कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सर्वाधिक जागा घेऊन राष्ट्रवादी पहिल्या स्थानावर राहिला आहे. मात्र महापालिकेच्या सुत्राप्रमाणे ज्याच्याकडे सर्वाधिक जागा असतील तो अध्यक्षपदावर दावा करण्याचा फार्म्युला निश्चित झाला आहे.

त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडीच्या चार जागा आमच्याच आहेत असा दावा केला आहे. या दाव्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. त्यावरून आज आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपले मत व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या राजकारणात बॉम्ब फोडला आहे

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दिला होता. महायुतीचे घटक पक्ष असल्यामुळे आम्ही महायुती सोबतच राहणार आहे. अध्यक्ष पदासाठी निर्णायक संख्याबळ आमच्याकडे आहे. पण महायुती जो निर्णय घेईल त्यासोबत आम्ही राहणार. शिरोळमध्ये तीन ठिकाणी आमच्या उमेदवारांचा थोडक्यात पराभव झाला, अन्यथा सहा ठिकाणी आमचा विजय असता.

आम्हाला देखील वाटत आहे की जिल्हा परिषदेवर अध्यक्ष आमच्या राजर्षी शाहू आघाडीचा असावा, अशा शब्दात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.

वर्ष उलटून गेले तरी जिल्हा नियोजन समितीची निवड अद्याप झाली नाही. यावर बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, ही निवड लवकरच होईल. जिल्हा परिषद महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणचे सदस्य नियोजन समितीत असतील. त्याला अधिक गती येईल, असे सांगितले.

पाटलांच्या पाठिंब्याची गरज नाही

राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे सूचक वक्तव्य काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केल्यानंतर त्या वक्तव्याचा समाचार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला.

राज्यात सर्वच ठिकाणी महायुतीची सत्ता आलेली आहे. त्यामुळे कोणाचीही आम्हाला पाठिंब्याची गरज नाही. त्याची आवश्यकता ही आम्हाला वाटत नाही. यापूर्वीच आमचे ठरलं आहे, जिथे शक्य आहे. तिथे स्वतंत्र लढू जिथे शक्य आहे तिथे एकत्र लढू. पण निकालानंतर महायुती म्हणून एकत्र येऊ त्या सूत्राप्रमाणे आम्ही जिल्ह्यात महायुती म्हणून सत्ता स्थापन करणार आहोत. असे पालकमंत्री अबिटकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT