Eknath Shinde Politics: नगरसेवकांच्या नाराजीने शिवसेना नेत्यांची धावपळ; आता नाशिक महापालिकेत मुंबई, ठाणे पॅटर्न!

Mumbai Shivsena Eknath Shinde NMC corporator discontent meeting resolved-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादाजी दूर करण्यासाठी नाशिकच्या नगरसेवकांना दिला नवा फॉर्मुला
Eknath shinde
Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: नाशिक महापालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला. मात्र उपमहापौर पदावरून काही नगरसेवकांनी थेट बंडाचे निशाण फडकवले. ही नाराजी दूर करण्यासाठी नेत्यांना चांगलीत धावपळ करावी लागली.

नाशिक महापालिकेत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली. मात्र राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांना नाशिक महापालिकेत सोबत घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला अनपेक्षीत लॉटरी लागली.

नाशिकला महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके यांची निवड झाली. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विलास शिंदे उपमहापौर झाले. मात्र शिवसेनेतील नगरसेवकांमध्ये उमेदवार निश्चित करण्यावरून मतभेद उफाळून आले.

Eknath shinde
Nirmala Gavit Politics: एकनाथ शिंदेंच्या नेत्याला मोठा दिलासा, माजी आमदार गावित यांच्या विरोधकांना न्यायालयाची चपराक!

विलास शिंदे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पक्षाचे महानगरप्रमुख बंटी तिदमे आणि राहुल दिवे यांना माघार घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यामुळे तिदमे समर्थकांत नाराजी उफाळून आली होती.

Eknath shinde
Nashik NMC Politics: समोर आडके-शिंदे, मागे रिमोट कंट्रोल राजकारण!, नाशिक महापालिकेत ठराविक नेतेच खरे बॉस?

गटनेते आणि उपमहापौर या दोन्ही पदांवरून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातून नगरसेवकांमध्ये वाद होता. विश्वासात न घेताच परस्पर ही घोषणा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. संदर्भात त्यांनी जाहीरपणे टीका करीत पक्ष नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते.

पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत नगरसेवकांची बैठक झाली. संपर्क नेते राम रेपाळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. या बैठकीत नगरसेवकांनी नाशिक शहरातील कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणावर संतप्त भावना व्यक्त केल्या. निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्व नगरसेवकांना संधी देण्याचे आश्वासन दिले. कोणत्याही नगरसेवकावर अन्याय होऊ देणार नाही असे ते म्हणाले. यासंदर्भात सर्वांची चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

त्यानंतर संपर्क नेते राम रेपाळे यांनी बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाने नगरसेवक समाधानी असल्याचे सांगितले. मुंबई आणि ठाणे महापालिकेप्रमाणेच जास्तीत जास्त नगरसेवकांना सत्तेत संधी देण्यात येईल. त्यामुळे उपमहापौर पद सव्वा वर्ष ठेवून त्यानंतर नवीन नगरसेवकांना संधी देण्यात येईल असे संकेत त्यांनी दिले.

राम रेपाळे यांच्या या भूमिकेमुळे नाशिकच्या नगरसेवकांमध्ये उत्साह वाढला आहे. स्थायी समिती सदस्य आणि अन्य पदांवर नगरसेवकांना संधी उपलब्ध होणार आहे. संदर्भात नगरसेवकांमधील नाराजी दूर करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली हे मात्र यानिमित्ताने स्पष्ट झाले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com