Kolhapur zilla parishad sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ZP Politics : ZP विषय समित्यांसाठी जोरदार राजकीय हालचाली; लॉबिंग, फिल्डिंग लावूनही कुपेकर, तायशेटे, सूर्यवंशी, पाटील यांची वर्णी

zilla parishad subject committee politics : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विषय समितीवर वर्णी लागावी म्हणून गेल्या आठ दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला होता.

Aslam Shanedivan

  1. जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांसाठी सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

  2. अनुभवी तसेच नव्या सदस्यांना समित्यांवर संधी देण्यात आली आहे.

  3. अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अर्ज वैध ठरवून निवड प्रक्रिया पूर्ण झाली.

Kolhapur zilla parishad news : जिल्हा परिषदेच्या विषय समितीवर संग्राम कुपेकर, अभिजित तायशेटे, एकनाथ पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, अमरसिंह पाटील, सर्जेराव पाटील-पेरीडकर, सुधीर देसाई यांच्यासह इतरांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. जुने अनुभवी आणि पहिल्यांदाच विजयी झालेल्या नवीन सदस्यांना विषय समित्यांवर संधी मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली विषय समित्यांच्या सदस्यांच्या बिनविरोध निवडी झाल्या.

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांसाठी सर्वच पक्षांतील इच्छुाकांनी आपआपल्या नेत्यांकडे विषय समित्यांसाठी फिल्डिंग लावली होती. गेल्या आठ दिवसांपासून यासाठी राजकीय हालचाली सुरू होत्या. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर झालेल्या सभापती निवडीनंतर सदस्यपद मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

आज सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान सदस्यपदासाठी इच्छुक असणाऱ्यांचे फॉर्म भरून घेतले. त्यानंतर दुपारी दोननंतर अध्यक्षा खोत यांच्या अध्यक्षतेखाली या अर्जांची छाननी झाली. यानंतर सर्व अर्ज वैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध घोषित केली. दरम्यान, आजच्या सभेत स्थायी समिती सदस्य म्हणून अमरसिंह पाटील, शिवाजी जाधव, अभिजित तायशेटे, रेश्‍मा देसाई, सुधीर देसाई, जयंत पाटील, महेश पाटील.

जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीमध्ये अनिरुध्द रेडेकर, अरुण जाधव, संग्राम पाटील, मानसी भोगण, राजकुंवर गायकवाड आणि सुयशा घाटगे.

कृषी समिती सदस्यपदी प्रियांका भोसले, मिलिंद कुरणे, विक्रमसिंह पाटील, राजेंद्र पाटील, विश्‍वनाथ पाटील, विलास नाईक, जयश्री गाडे, शोभाताई फराकटे, राजश्री गावडे आणि सुवर्णा पाटील.

समाजकल्याण समिती सदस्यपदी अतीश शिंगे, राहुल आवळे, कुमार कांबळे, सुवर्णा कांबळे, प्रचिता कोळी, शोभा बेलेकर, अर्चना निकम, शोभाताई फराकटे, सलिम महात, नंदिनी कांबळे आणि रसिका पाटील.

शिक्षण व क्रीडा समितीमध्ये स्नेहल वेल्हाळ, उत्तरा शिंदे, शुभांगी कुंभार, सानिका आवाडे, रेखाताई मुगडे, भगवान पाटील, अमरसिंह चव्हाण आणि एकनाथ पाटील.

बांधकाम समितीवर राजेंद्र सूर्यवंशी, सर्जेराव पाटील-पेरीडकर, अमोल चव्हाण, इंद्रजित पाटील, अमरसिंह पाटील, संभाजी पाटणकर, काकासाहेब सावडकर आणि शिरीष देसाई.

अर्थ समितीवर रवींद्र पाटील, एकनाथ पाटील, नामदेव वाईंगडे, अमृता डोंगळे, सात्ताप्पा पाटील, शिवशंकर हत्तरकी, राजश्री गावडे आणि सागर धुंदरे.

महिला व बालकल्याण समितीवर वर्षाराणी पाटील, रोहिणी आबिटकर, संयोगिता मोरे, प्रतिभा चव्हाण, शैलजा भोसले, विनिता भोगम आणि सोनाली पाटील.

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीवर प्रचिता कोळी, अरुण जाधव, छाया देसाई, अर्चना चौगुले, नामदेव वाईंगडे, रचना गावडे, शैलजा आणि अश्‍विनी बिरांजे.

आरोग्य समितीवर सर्जेराव पाटील-पेरीडकर, वर्षा सावर्डेकर, सुदर्शन खोत, प्रशांत शहापुरे, क्रांतीसिंह पवार-पाटील, पूजा पाटील, रचना गावडे आणि सोनाली सावंत यांची निवड झाली आहे.

यावेळी उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शीतल यादव, समाजकल्याण समिती सभापती श्रध्दा गायकवाड, महिला व बाल कल्याण समिती सभापती विद्या पाटील, प्रशासन अधिकारी ओमप्रकाश यादव उपस्थित होते.

जिल्हा परिषदेत पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस - २५

काँग्रेस - १७

भाजप - १५

शिवसेना शिंदे गट - ११

जनुसराज्य - ७

राजर्षी शाहू आघाडी - ५

शिवसेना (उबाठा) - १

शिव-शाहू आघाडी - १

अपक्ष - १

FAQs :

1. विषय समित्यांची निवड कशी झाली?
सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

2. या प्रक्रियेत कोण अध्यक्ष होते?
अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पडली.

3. कोणकोणत्या सदस्यांची निवड झाली?
संग्राम कुपेकर, अभिजित तायशेटे, एकनाथ पाटील आदींची निवड झाली.

4. निवडणुकीपूर्वी काय घडामोडी झाल्या?
आठ दिवसांपासून राजकीय हालचाली आणि लॉबिंग सुरू होते.

5. नवीन सदस्यांना संधी मिळाली का?
होय, नव्या आणि अनुभवी सदस्यांना संधी देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT