Kolhapur Zilla Parishad News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती दिली आहे. ही पदोन्नती देताना चुकीच्या पद्धतीने आणि नियमबाह्यरीत्या दिली असल्याची तक्रार करण्यात आली. याच तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या तब्बल २११ शिक्षकांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दणका दिला आहे.
या शिक्षकांच्या पदोन्नती तत्काळ रद्द करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या जिल्हा परिषद शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हा परिषदेत मनमानीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा इशारा शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांना दिला आहे.
जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात सुरू असणाऱ्या मनमानीला चाप लावण्याचे काम जि. प. अध्यक्षांसह आता पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून केले जात आहे. चुकीच्या पद्धतीने केलेली पदोन्नती रद्द करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत पालकमंत्री आबिटकर यांनी या प्रक्रियेची चौकशी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यात १४ मे २०२६ च्या पत्रानुसार पदोन्नती दिली होती. ही पदोन्नती देताना काही नावे घुसडल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच, याविरुद्ध मोर्चाही काढला. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आबिटकर यांनी सर्व शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीसाठी बोलावले होते.
यावेळी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन शिक्षणाधिकारी डॉ. शेंडकर यांनाही बोलावून घेतले. त्यानंतर झालेल्या प्रकाराबद्दल त्यांना खडे बोल सुनावले. जे लोक परीक्षा देऊन पदोन्नती मिळाली आहे. त्याव्यतिरिक्त इतरांची पदोन्नती स्थगित करावी. शासनाने दिलेल्या निर्णयानंतरच दुसरी पदोन्नती द्यावी, अशा सूचना केल्या आहेत.
अहवाल तातडीने देण्याचे आदेश जिल्हा परिषदेत केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक पदासाठी झालेल्या पदोन्नती प्रक्रियेची चौकशी करावी. त्याचा अहवाल तातडीने द्यावा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांना दिले आहेत. त्यानुसार ही चौकशी केली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.