Kolhapur ZP : काँग्रेसने शेवटच्या क्षणी दोन्ही अर्ज मागे घेतल्याने कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिल्पा खोत यांची तर उपाध्यक्षपदी भाजपच्या तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेवटपर्यंत भाजप नेत्यांसोबत बोलणी करत अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे खेचून आणले.
जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार अध्यक्षपदासाठी शिंगणापूर गटातील जिल्हा परिषद सदस्य रसिका पाटील तर उपाध्यक्षपदासाठी असळज जिल्हा परिषद गटातील संभाजी पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनंती आल्यास बिनविरोध निवड करण्यासाठी अर्ज मागे घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्रामसिंह कुपेकर यांनी भर सभागृहातच काँग्रेसला विनंती केली. त्यानंतर आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडून मैत्री धर्म पाळत काँग्रेस उमेदवारांचे अर्ज मागे घेतले.
कुपेकर म्हणाले, 5 वर्षे आपण सभागृहात आहोत. कोल्हापूर नगरी ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराची आहे. पाच वर्षे आपण एकमेकांना न्याय देत जिल्ह्याला विकासाचा दृष्टिकोन देत या सभागृहात राहूया. त्यामुळे महाविकास आघाडीने दाखल केलेला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती केली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनंती झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार रसिका पाटील आणि उपाध्यक्षपदाचे उमेदवार संभाजी पाटणकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. सतेज पाटील यांच्या गटाने अध्यक्षपदाची निवड बिनविरोध केल्यानंतर उपाध्यक्ष निवड बिनविरोध होणार का याबाबत उत्सुकता लागून राहिली होती.
पाटील आणि महाडिक गटाच्या संघर्षात महाडिक गटाचे कट्टर समर्थक तानाजी पाटील यांच्या बाबत सतेज पाटील गट काय निर्णय घेणार? याकडे लक्ष होते. मात्र या 5 वर्षात महाविकास आघाडीच्या सदस्यांना आदर व विकासनिधी बाबत कोणताही भेदभाव असू नये, अशी मागणी करत ही निवड बिनविरोध केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.