Eknath Shinde news : आमदारकीसाठी ठाकरेंचा फोन आल्यास मदत करणार का? एकनाथ शिंदेंनी वाढविली धाकधूक, म्हणाले...

Uddhav Thackeray political update : उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ पुढील काही दिवसांत संपणार आहे. त्यांना पुन्हा विधानपरिषदेत जाण्याची इच्छा असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Legislative Council election : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने आपण उमेदवार दिला नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळीही शिंदेंची शिवसेना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदत करणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबत सूचक विधान केले होते. विधान परिषदेसाठी उमेदवारी हवी असल्यास उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना फोन करावा, असे म्हस्के म्हणाले होते. आज दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी बोलताना यावर भाष्य केले आहे.

शरद पवारांना राज्यसभेत मदत केली त्याचप्रमाणे विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंना मदत करणार का, या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, राज्यसभा निवडणूक होऊन गेली आहे. विधानपरिषदेची निवडणूक आल्यानंतर तेव्हा पाहू, असे सूचक विधान शिंदे यांनी केले आहे. त्यांनी ठाकरेंना मदत न करण्याबाबत थेट कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीवेळी शिंदे ठाकरेंना मदत करणार की नाही, याबाबत गूढ वाढले आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : आधी तावडे, आता बावनकुळेंनी करून दाखवलं! संसदेत वाढविली भाजपची ताकद, ‘ती’ खेळी यशस्वी...

राज्यसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांच्यामुळे ठाकरेंना उमेदवार देता आला नाही, अशी चर्चा आहे. ही जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी प्रामुख्याने आमदार आदित्य ठाकरे खूप आग्रही असल्याचे दिसत होते. शरद पवार उमेदवार नसतील तर शिंदे उमेदवार देणार होते. त्यांनी रोहित टिळक यांचे नावही फायनल केले होते, अशी चर्चा होती. पण पवारांसाठी त्यांनी माघार घेतली.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Rajya Sabha Election update : हरियाणात मध्यरात्री एका मताने राखली काँग्रेसची लाज; भाजपने गेम पलटवला होता, पण अखेर पराभव...

उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ पुढील काही दिवसांत संपणार आहे. त्यांना पुन्हा विधानपरिषदेत जाण्याची इच्छा असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे ठाकरे उमेदवार असल्यास महायुती उमेदवार देणार की नाही, याची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com