Himayani Puri : राहुल गांधींनी रान उठविलेल्या 'एपस्टीन'चा मुद्दा हायकोर्टात; केंद्रीय मंत्र्याच्या लेकीनं उचललं मोठं पाऊल अन् लगेच आदेशही...

Delhi HC on Hardeep Singh Puri's Daughter : हिमायनी पुरी यांच्या वकिलाने कोर्टात युक्तिवाद करताना सोशल मीडियावरील आरोप हे त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी रचलेल्या कटाचा भाग असल्याचं सांगितलं. तसंच माझा जेफ्री एपस्टीनशी कोणताही संबंध नाही. मी एका केंद्रीय मंत्र्यांची मुलगी असल्यामुळे मला लक्ष्य केले जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Rahul Gandhi, Himayani Puri
Rahul Gandhi speaking in Parliament while raising concerns over India’s energy security and referencing the Epstein files controversy.Sarkarnama
Published on
Updated on

Court Relief to Himayani Puri : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्य पुर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी एपस्टीन फाइल्सचा उल्लेख करत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पूरी यांचे नाव घेतलं. शिवाय आपल्याकडे असा एक पुरावा आहे. ज्यामध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलीचं नाव देखील आहे, असा दावा राहुल यांनी केला होता.

या मुद्द्यावरूनच केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या कन्या हिमायनी पुरी यांनी कोर्टात एक याचिका दाखल केली होती. आता या याचिकेवर सुनावणी पार पडली असून पुरी यांना मोठा दिलासा दिला आहे. कारण, न्यायालयाने जेफ्री एपस्टीन यांच्याशी त्यांचा संबंध जोडणारा सर्व आक्षेपार्ह ऑनलाइन मजकूर तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत.

तसंच प्रथमदर्शनी हे प्रकरण हिमायनी पुरी यांच्या बाजूने असल्याचं न्यायालयाने नमुद केलं आहे. हिमायनी पुरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सर्व आक्षेपार्ह मजकूर त्वरित हटवण्याचे आणि तो हटवला गेला नाही, तर मध्यस्थ प्लॅटफॉर्मने २४ तासांच्या आत तो काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

Rahul Gandhi, Himayani Puri
West Bengal Election 2026 : ममता दीदींना टफ फाईट : भाजपच्या पहिल्या यादीत 23 शिक्षक, 5 डॉक्टर, 6 वकिलांना उमेदवारी

मात्र, हा आदेश केवळ भारतीय न्यायक्षेत्रात अपलोड करण्यात आलेल्या मजकुरापुरताच लागू असेल, असं दिल्ली उच्च न्यायालय यांनी स्पष्ट केलं आहे. तर मध्यस्थ प्लॅटफॉर्मसह सर्व प्रतिवादींना समन्स बजावून त्यांचे उत्तर आल्यानंतर पुढील सुनावणी करण्यात येईल, असंही न्यायालयाने सांगितलं.

हिमायनी पुरी यांच्या वकिलाने कोर्टात युक्तिवाद करताना सोशल मीडियावरील आरोप हे त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी रचलेल्या कटाचा भाग असल्याचं सांगितलं. तर माझा जेफ्री एपस्टीनशी कोणताही संबंध नाही. मी एका केंद्रीय मंत्र्यांची मुलगी असल्यामुळे मला लक्ष्य केले जात आहे. यामागे राजकीय द्वेष असण्याची शक्यता आहे, असं हिमायनी पुरी यांनी म्हटलं.

Rahul Gandhi, Himayani Puri
US Attack on Iran Ships : तेलमार्गावरच युद्ध पेटलं! होर्मुझमध्ये सुरुंग पेरणारी इराणची 16 जहाजे उडवली, अमेरिकन सैन्याने कारवाईचा थरारक VIDEO केला शेअर

शिवाय मी वित्तीय विश्लेषक, बँकर आणि गुंतवणूकदार म्हणून काम करते, त्यामुळे माझी जागतिक प्रतिमा जपणे आवश्यक आहे, असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. दरम्यान, या याचिकेत भारतापुरतेच नव्हे, तर जागतिक स्तरावर हा मजकूर हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, वरिष्ठ वकिलांनी जागतिक स्तरावर मजकूर हटवण्याचा मुद्दा सध्या प्रलंबित असून, सध्या फक्त भारतातील मजकूरच हटवता येऊ शकतो, असं स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com