Prathamesh Kothe-Devendra Kothe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kothe family Politic's : ‘कोठे फॅमिली’साठी आरक्षणाच्या सोंगट्या अनुकूल; देवेंद्र अन॒ महेश कोठेंच्या जागेवर कोण? प्रथमेश कुठून लढणार?

Solapur Ward Reservation : सोलापूर महापालिकेच्या आरक्षण सोडतीत कोठे परिवाराचा बालेकिल्ला कायम राहिला आहे. देवेंद्र, महेश आणि प्रथमेश कोठे यांच्या प्रभागांत अनुकूल आरक्षण जाहीर झाल्याने नव्या उमेदवारांची उत्सुकता वाढली आहे.

Vijaykumar Dudhale

कोठे परिवाराच्या पुढील उमेदवारावर लक्ष केंद्रीत:

भाजपचे आमदार देवेंद्र कोठे विधानसभा निवडून आल्याने, त्यांच्या जागी कोण नगरसेवक निवडणुकीत उतरणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचे भाऊ सूर्यप्रकाश कोठे यांच्या नावाची चर्चा आहे.

प्रभाग 7, 10, 11, 12 मध्ये कोठे परिवारासाठी अनुकूल आरक्षण:

या प्रभागांमध्ये सर्वसाधारण व महिला प्रवर्गाचे अनुकूल आरक्षण जाहीर झाल्याने कोठे परिवाराला निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.

कोठेंच्या सासूबाई पुन्हा मैदानात?

आमदार देवेंद्र कोठे यांच्या सासूबाई श्रीकंचना यन्नम यांच्यासाठीही अनुकूल आरक्षण जाहीर झाले असून त्या पुन्हा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Solapur, 11 November : सोलापूर महापालिकेच्या प्रभागाची बहुचर्चित आरक्षण सोडत आज (ता. 11 नोव्हेंबर) अखेर जाहीर झाली. या सोडतीमध्ये सोलापूर शहरातील बहुतांशी प्रस्थापित राजकारण्यांचे प्रभाग गड सुरक्षित राहिले आहेत. महापालिकेची आरक्षण सोडत सोलापूर शहरात वर्चस्व राखून असलेल्या कोठे फॅमिलीसाठी सर्वाधिक सुरक्षित आणि अनुकूल ठरली आहे.

कोठे परिवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे प्रभाग क्रमांक 07, 10, 11 आणि 12 मध्ये सोयीचे आरक्षण जाहीर झाले आहे. आता आमदार देवेंद्र कोठेंच्या (Devendra Kothe) जागी कोण लढणार?, महेश कोठेंच्या जागेवर कोण लढणार?, प्रथमेश कोठे कोठून रिंगणात उतरणार की कोठे परिवारातील आणखी एखादा नवा सदस्य राजकारणात एन्ट्री करणार?, याची उत्सुकता ताणली गेली आहे.

सोलापूर महापालिकेवर (Solapur Corporation) अनेक वर्षे काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. मात्र, काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात कोठे बोले आणि प्रशासन हाले अशी परिस्थिती होती. भाजपची सत्ता आल्यानंतरही कोठे यांनी आपल्या हक्काच्या प्रभागातून मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आणण्याचे काम केले होते. त्यामुळे महापलिकेवर कोणाचीही सत्ता असली तरी प्रशासकीय पातळीवर कोठेंचे वर्चस्व कायम होते.

मागील महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग सातमधून देवेंद्र कोठे निवडून आले होते. त्यांच्यासोबत सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि सारिका पिसे, मंदाकिनी पवार निवडून आल्या होत्या. मधल्या काळात देवेंद्र कोठेंनी भाजपत प्रवेश करून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार झाले आहेत. आता देवेंद्र कोठे यांच्या जागी कोण निवडणूक लढविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देवेंद्र कोठे यांचे बंधू सूर्यप्रकाश कोठे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ते निवडणुकीच्या रिंगणात खरंच उतरतात का हे पाहावे लागेल. तसेच, प्रथमेश कोठे आपला पूर्वांपार प्रभाग सोडून प्रभाग सातमध्ये येणार का?, हे पाहावे लागेल. कारण कोठे परिवारासाठी हा प्रभाग सुरक्षित मानला जातो.

प्रभाग दहामधून गेल्या निवडणुकीत महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे निवडून आले होते. आताही प्रभाग दहामध्ये एक जागा खुली असून दोन सर्वसाधारण महिलेसाठी, तर एक ओबीसीसाठी राखीव आहे. त्यामुळे प्रथमेश कोठे प्रभाग दहामधून पुन्हा नशीब अजमावरणार का हे पाहावे लागणार आहे. हा प्रभागही कोठे यांचा बालेकिल्ला असून या वेळी त्यांना अनुकूल आरक्षण पडले आहे.

महापालिकेच्या मागील निवडणुकीत प्रभाग अकरामधून माजी महापौर (स्व.) महेश कोठे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांच्या अकाली निधनामुळे अकरामधून कोठे परिवारातील कोण निवडणुकीच्या रिंगणात असणार, याची उत्सकता आहे. या प्रभागात कोठे परिवारासाठी सोयीचे आरक्षण जाहीर झाले आहे.

प्रभाग बारामधून मागील निवडणुकीत कोठे समर्थकांचा विजय झाला होता. या वेळी कोठे आणि समर्थकांसाठी अनुकूल आरक्षण जाहीर झलेले आहे, त्यामुळे कोठे गटाची सूत्रे आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे असणार की महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्याकडे असणार, यावरही बरीच समीकरणे अवलंबून आहेत.

आमदार कोठेंच्या सासूबाई पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात?

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरामधून आमदार देवेंद्र कोठे यांच्या सासूबाई श्रीकंचना यन्नम या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. आता त्यांच्यासाठी अनुकूल आरक्षण जाहीर झालेले आहे, त्यामुळे श्रीकंचना यन्नम पुन्हा पालिकेच्या वर्तुळात दिसणार का, हे पाहावे लागणार आहे. त्या पुन्हा भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात दिसतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोठे परिवाराचा बालेकिल्ला असलेले प्रभाग आणि आरक्षण

प्रभाग क्रमांक ७

अ - ना.मा. प्रवर्ग (महिला)

ब - सर्वसाधारण (महिला)

क - सर्वसाधारण

ड - सर्वसाधारण

.....................

प्रभाग क्रमांक १०

अ - ना.मा. प्रवर्ग

ब - सर्वसाधारण (महिला)

क - सर्वसाधारण (महिला)

ड - सर्वसाधारण

--------

प्रभाग क्रमांक ११

अ - ना.मा. प्रवर्ग (महिला)

ब - सर्वसाधारण (महिला)

क - सर्वसाधारण

ड - सर्वसाधारण

---------

प्रभाग क्रमांक १२

अ - ना.मा. प्रवर्ग (महिला)

ब - सर्वसाधारण (महिला)

क - सर्वसाधारण

ड - सर्वसाधारण

Q1: देवेंद्र कोठेंच्या जागी कोण निवडणूक लढवू शकतात?

A1: त्यांच्या भावाचा सूर्यप्रकाश कोठे यांच्या नावाची चर्चा आहे.

Q2: कोणते प्रभाग कोठे परिवारासाठी सुरक्षित मानले जातात?

A2: प्रभाग क्रमांक 7, 10, 11 आणि 12 हे कोठे परिवाराचे बालेकिल्ले मानले जातात.

Q3: श्रीकंचना यन्नम पुन्हा निवडणूक लढवतील का?

A3: होय, त्यांच्यासाठी अनुकूल आरक्षण जाहीर झाल्याने त्या पुन्हा मैदानात उतरू शकतात.

Q4: प्रथमेश कोठे कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवू शकतात?

A4: त्यांनी प्रभाग 10 मधून पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT