Solapur BJP : सोलापूर भाजपमध्ये वाद पेटला; आमदार देशमुखांच्या कार्यक्रमाला जाऊ नका, कोठे, शहराध्यक्षांनी सूचना केल्याचा आरोप

Vijaykumar Deshmukh VS Devendra Kothe-Rohini Tadawalkar : सोलापूर भाजपमध्ये आमदार विजयकुमार देशमुख आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यात उफाळलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला आहे.
Vijaykumar Deshmukh- Devendra Kothe-Rohini Tadwalkar
Vijaykumar Deshmukh- Devendra Kothe-Rohini TadwalkarSarkarnama
Published on
Updated on
  1. सोलापूर भाजपमध्ये आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यात संघर्ष उफाळला आहे.

  2. देशमुख यांच्या बैठकीला जाऊ नका, अशा सूचनांचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत असून, बैठका आणि मतदारसंघ हद्दीवरून वाद वाढला आहे.

  3. तडवळकर आणि कोठे यांनी आरोप फेटाळले असून, गैरसमजातून प्रकरण वाढल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Solapur, 09 October : सोलापूर शहर भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. आमदार विजयकुमार देशमुख आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर हे आमनेसामने आले असून जाहीरपणे एकमेकांविरोधात बोलले जात आहे. आमदारांच्या बैठकीला जाऊ नका, असे शहराध्यक्ष सांगत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. ‘कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिला, तर कमरेत लाथ घाला,’ अशी विधाने केली जात आहे. आमदार देशमुख विरुद्ध शहराध्यक्ष तडवळकर, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे असा संघर्ष त्यातून दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील हा संघर्ष कुठपर्यंत जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) आणि आमदार देवेंद्र कोठे यांचे मतदारसंघात एकमेकांच्या शेजारी आहेत. या मतदारसंघाच्या हद्दीवरून हा वाद उफळाल्याचे बोलले जात आहे. त्यातच सोलापूरच्या शहराध्यक्षा ह्या देशमुख यांची शिफारस डावलून नेमण्यात आलेल्या आहेत. त्यातच आमदार कोठे आणि शहराध्यक्ष तडवळकर यांच्यावर आमदार देशमुखांच्या बैठकीला जाऊ नका, असे सांगितले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे संषर्घ तीव्र होताना दिसत आहे.

आमदार विजयकुमार देशमुख यांनी माझ्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिला तर सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा थेट मुख्यमंत्र्यांसमोर बोलताना दिला होता. त्यावेळीच सोलापूर शहर भाजपमध्ये (Solapur BJP) अंतर्गत वाद धूसफुसत असल्याचे दिसून येत होते. त्याचा आता भडका उडाल्याचे दिसून येत आहे.

आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका निवडणुकीसाठी आक्रमक मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. प्रभाग अकराचा काही भाग सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर शहर मध्‍य या दोन्‍ही मतदारसंघात येतो. तेथे आमदार देशमुख हे कार्यक्रम घेताना दुसऱ्या गटाने देशमुख यांच्‍यावर कुरघोडी करण्‍याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच भाजपमध्ये वाद पेटल्याचे दिसून येत आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील, तसंतसा हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

माझ्यासोबत तडीपार नव्हे; भाजप कार्यकर्ता : आमदार देशमुख

यासंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, लिंगायत समाजाचा नुकतेच हुबळी येथे मेळावा झाला. त्यानंतर जगद्‌गुरु, मठाधीश यांनी लिंगायत समाजातील नेत्यांना समाज बैठक घेण्याची सूचना केली. सोलापूर शहरातही ज्या ठिकाणी लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी बैठक घेण्यात येत आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी लिंगायत समाजाची बैठक बोलावली होती, त्या बैठकीला मीही गेलो होतो.

त्या बैठकीत जनगणनेच्या फॉर्ममधील जातीच्या कॉलममध्ये काय लिहियाचे याबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीला काहींनी विरोध केल्याची माहिती होती. ज्यांनी या बैठकीला विरोध केला, त्यांना उद्देशून मी बोललो. माझ्यासोबत तडीपार झालेला कोणी नव्हता, तर तो भाजपचा कार्यकर्ता आहे, हे पक्षातील लोकांना माहिती आहे.

Vijaykumar Deshmukh- Devendra Kothe-Rohini Tadwalkar
Pune ZP : पुण्यातील ग्रामपंचायतींचा वेगळाच माज; 3,43,00,00,000 रुपये खर्चाविना धूळखात पडून, जिल्हा परिषदेचं टेन्शन वाढलं

‘देशमुखांचे कार्यक्रम घ्यायचे नाहीत; कोठे तडवळकरांच्या सूचना’

मी भाजपचा कार्यकर्ता आहे. गेल्या सात-आठ वर्षांत माझ्यावर कोणतेही गुन्हे नाहीत. यापूर्वी सोलार कंपनी विरोधात मी शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायालयात गेलो होतो. त्यामुळे नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. मला पोलिसांनी तडीपारची नोटीस दिली होती. त्याविरोधात मी विभागीय आयुक्तांकडे अपिलात आहे.

प्रभागात कार्यक्रम घेऊ नको, शहर मध्यमध्ये विजयकुमार देशमुखांचे कार्यक्रम घ्यायचे नाही, अशा तोंडी सूचना आमदार देवेंद्र कोठे यांचे कार्यकर्ते आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी केल्‍या होत्या. आम्ही त्यांचा विरोध झुगारून समाजाची बैठक लावली. त्यामुळे तडीपारीच्या कारवाईचा ससेमिरा माझ्या मागे लागला, असे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक श्रीशैल हुळ्ळे यांनी सांगितले.

‘शहराध्यक्षांचे व्हॉट्‌सअप कॉल’

भारतीय जनता पक्षाचा मी 40 वर्षांपासून कार्यकर्ता आहे. शहराध्यक्ष मला व्हॉटस॒अप कॉल करून कार्यक्रमला जाऊ नका म्हणून असे सांगत आहेत. आम्ही कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता भाजपसाठी काम करत आहोत. लिंगायत समाजातील पोटजातींना एकत्रित येण्यासाठीचा हा मेळावा होता. त्‍याला जाऊ नका असे काही लोक सांगतात, ते चुकीचे आहे, असे सोलापूर शहर पूर्व मध्य मंडळ चिटणीस चन्नया हिरेमठ यांनी नमूद केले.

मी कोणालाही निरोप दिलेला नाही : शहराध्यक्षा

भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, प्रभाग अकरा हा शहर उत्तर आणि शहर मध्य मतदारसंघात येतो. या ठिकाणी कोणती बैठक होणार आहे, याची मला काहीच माहिती नव्हती. बैठकीला जाऊ नका, असे मी कोणालाही सांगितले नाही. असे कोणी सांगत असेल तर ते चुकीचे आहे. आमदारांनी जे वक्तव्य केले आहे, ते गैरसमजूतीमधून झाले आहे, असा दावा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी केला.

यासंदर्भात मला काहीही माहिती नाही : देवेंद्र कोठे

असं बोललेला माझा कोणता कार्यकर्ता आहे, हे त्यांनी सांगावं. मी त्याच्याकडून वस्तूस्थिती जाणून घेतो. त्या ठिकाणच्या बैठकीची अथवा कार्यक्रमाची माहिती मला नव्हती. मला या संपूर्ण घटनेची माहिती मीडियामधूनच कळाली आहे, असे स्पष्टीकरण आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले आहे.

Vijaykumar Deshmukh- Devendra Kothe-Rohini Tadwalkar
Ajit Pawar : अजित पवार खेळाच्या मैदानात उतरणार, अध्यक्षपदासाठी चौथ्यांदा थोपटले दंड!

प्रश्न 1 : सोलापूर भाजपमधील वादाचे कारण काय आहे?
आमदारांच्या बैठका आणि मतदारसंघाच्या हद्दीवरून निर्माण झालेला तणाव.

प्रश्न 2 : आमदार विजयकुमार देशमुखांनी काय प्रतिक्रिया दिली?
कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

प्रश्न 3 : रोहिणी तडवळकर यांचा आरोपांवर काय प्रतिसाद आहे?
त्यांनी कोणालाही बैठकीला जाऊ नका, असे सांगितले नसल्याचे स्पष्ट केले.

प्रश्न 4 : देवेंद्र कोठे यांची भूमिका काय आहे?
प्रकरणाची माहिती त्यांना मीडियातूनच कळाल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com