Officials review Krishna Valley Development Corporation’s plan to lease land, expand fisheries, tourism and energy projects, aiming to boost revenue and achieve administrative autonomy. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Krishna Khore : फक्त पाण्यातून तब्बल 20 हजार कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन : कृष्णा खोरे महामंडळाचा नवा रोडमॅप तयार

Krishna Khore News : कृष्णा खोरे विकास महामंडळाने जमीन भाडेतत्त्वावर देणे, मत्स्य उत्पादन, पर्यटन व ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी दोन सल्लागार कंपन्यांच्या माध्यमातून अहवाल तयार करण्यास सुरुवात केली असून स्वायत्त वाटचाल सुरू केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Krishna Khore Development News : मत्स्य उत्पादन, ऊर्जा निर्मिती, तसेच पर्यटनासाठी जागा भाडेतत्त्वावर देणे, यासारखे अनेक उपक्रमांच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत वाढविणे आणि स्वायत्ततेचा दर्जा मिळविण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी दोन स्वतंत्र सल्लागार कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. उत्पन्न वाढविणे आणि त्यातून नियोजित प्रकल्प मार्गी लावणे, हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

कृष्णा खोरे विकास महामंडळाने यापूर्वीच पुणे विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये धरण, कालवे अशा प्रकल्पांसाठी अनेक ठिकाणी जमिनी संपादित केल्या आहेत. त्या जमिनींची ‘लँड बँक’ करण्याचा महामंडळाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी कोणकोणत्या ठिकाणी विभागाच्या जमिनी आहेत, त्याचा शोध घेऊन त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर जलसंपदा विभागाचे नाव लावण्याची मोहीम विभागाकडून मध्यंतरी राबविण्यात आली.

आता एक पाऊल टाकत महामंडळाने स्वायत्त होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दोन स्वतंत्र कंपन्यांची नेमणूक करीत त्यांच्या माध्यमातून अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. अनेक जमिनींच्या सातबाऱ्यावर जलसंपदा विभागाचे नाव नाही. काही ठिकाणी जमिनीवर अतिक्रमणे आहेत. त्यामुळे सर्व जमिनींची माहिती संकलित करणे, त्या जमिनी 25 ते 30 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देणे, धरणांच्या परिसरात पर्यटन केंद्र उभारणे, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मत्स्य उत्पादनासाठीचे ठेके देणे, त्याचबरोबर पाण्यापासून विविध ऊर्जा प्रकल्प उभारणे यांचा अभ्यास करण्याचे काम या सल्लागार कंपन्यांकडून सुरू करण्यात आले आहे.

जागा आणि त्या माध्यमातून किती आणि कसा निधी उभारू शकतो, यांचा असे दोन स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येणार आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. पाणीपट्टी हे महामंडळाच्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. सुमारे 800 ते 1 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळते. हे उत्पन्न वाढविणे आणि वाढलेल्या उत्पन्नातून महामंडळाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावणे, हा त्यामागे उद्देश आहे. जेणे करून महामंडळ स्वायत्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

20 हजार कोटींचे उत्पन्न मिळणार :

पहिल्या टप्प्यात महामंडळाच्या मालकीचे 35 मोठे आणि 50 मध्यम प्रकल्प आहेत. त्याठिकाणी हे प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मत्स्य उत्पादनाचे काम हे मत्स्य विभागाकडून केले जाते तर धरणातील पाण्यापासून वीजनिर्मितीचे काम महाजनको आणि खासगी कंपनीमार्फत केले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT