

Pune News : मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत "महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, वेबसाईट बंद आहे, व्याज परतावाही थांबवला आला आहे" अशा चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पाहायला मिळत आहेत. यात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे हे कामकाज बंद आहे, असा आरोप केल्याने खळबळ उडाली होती.
त्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची धडपड सुरु आहे. सर्व चर्चा या अफवा असल्याचा खुलासा शुक्रवारी पत्रक काढून करण्यात आला होता. त्यानंतरही चर्चा थांबत नसल्याने थेट अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी अर्थात व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी याबाबत माध्यमांना माहिती देऊन सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चाबाबत खुलासा केला आहे.
महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे" अशा प्रकारच्या निराधार अफवा काही व्यक्तींकडून सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पसरवल्या जात आहेत. या अफवांना कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर रार्व कामकाज सुरळीतपणे सुरु असल्याची माहिती विजयसिंह देशमुख,यांनी दिली आहे.
देशमुख म्हणाले, महामंडळाच्या वेब प्रणालीचे १० ऑक्टोबर पासून अपग्रेडेशनचे काम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये वेब प्रणालीचे काही कामे प्रलंबित होते ते पूर्ण करण्यात येत आहे. महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या योजनाबाबत लाभार्थ्यांची फसवणूक एजंट मार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे वेबसाईट अपडेट केली जात आहे.
राज्यात विविध ठिकाणी एजंटमार्फत लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने, सद्यस्थितीत नाशिक (Nashik) व अहमदनगरमध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंद केले गेले आहेत. असे प्रकार घडू नयेत यासाठी वेब प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरु आहे.
नवीन प्रणालीच्या आधारे एजंटच्या माध्यमातून होणारे फसवणूक टाळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले आहेत. थेट लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही वेबसाईट डेव्हलप करण्यात आली आहे.
मात्र, ही काम सुरू असताना काही अफवा समाज माध्यमांवर पसरविण्यात येत आहेत.त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या राजकीय, दिशाभूल करणाऱ्या किंवा अफवांवर आधारीत माहितीवर विश्वास ठेवू नये असेही देशमुख यांनी सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.