Raosaheb Danve News : भाजपचे नेटवर्क राज्यात मजबूत, आता फक्त कार्यकर्त्यांना चार्ज करणार

Raosaheb Danve says BJP's network is strong in the state : पक्षाने दिलेली जबाबदारी आनंदाने स्वीकारत रावसाहेब दानवे यांनी कामाला सुरवातही केली आहे. राज्यातील बहुतांश बुथवर आमचे नेटवर्क मजबूत आहे. आम्ही सर्व 98700 बुथवर ते मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचे काम मी करणार, असल्याचे दानवे सांगतात.
Raosaheb Danve News
Raosaheb Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP Political News : राजकारणातील चाळीस वर्षात पंचवीस वर्ष विरोधी पक्षात तर पंधरा वर्ष सत्तेत होते. संघटनेत काम करण्याचा मला अनुभव असल्यानेच पक्षाने माझ्यावर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी संयोजक म्हणून विश्वास टाकला असावा. राज्यातील बहुतांश बुथवर आमची ताकद आहे. आता संपुर्ण 98 हजार 700 बुथवर पक्षाचे नेटवर्क मजबूत करण्याचे माझे ध्येय आहे. आता फक्त निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना चार्ज करायचे आहे, असे सांगत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्याला देण्यात आलेल्या जबाबदारीबद्दल समाधान व्यक्त केले.

गावचे सरपंच, दोन वेळा आमदार, पक्षाचे दोन वेळा प्रदेशाध्यक्ष, सलग पाच वेळा खासदार आणि केंद्रात दोनदा राज्यमंत्री राहिलेले रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आता पुन्हा संघटनेत महत्वाची जबाबदारी घेऊन सज्ज झाले आहेत. लोकसभेच्या जालना मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर जनतेने मला नाकारले आहे, आता विधान परिषद, राज्यसभा अशा मागच्या दाराने मला कुठलेही पद नको, अशी भूमिका रावसाहेब दानवे यांनी घेतली होती.

परंतु दानवे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला दिल्लीतील पक्षाचे वरिष्ठ लांब ठेवणार नाही, अशी आशा त्यांचे समर्थक बाळगून होते. महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्यावेळी रावसाहेब दानवे यांना उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र दानवे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नम्रपणे नकार कळवला होता. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याच्या दोन दिवसानंतरच दानवे यांनी स्वतःला पक्ष, संघटेनेच्या कामात झोकून दिले होते.

Raosaheb Danve News
Raosaheb Danve News : राज्यसभेची संधी हुकली, रावसाहेब दानवे आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत..

विधानपरिषदेवर जाण्यास नकार दिल्यानंतर महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेवर रावसाहेब दानवे यांची वर्णी निश्चित लागणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. (BJP) पण धक्कातंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपने या दोन्ही जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देत, मित्र पक्षांना दिलेला शब्द आम्ही पाळतो हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेवर संधी मिळेल ही दानवे समर्थकांची आशा मावळली, त्यानंतर आता ते पुर्णवेळ संघटनेतच काम करतील हे स्पष्ट झाले होते.

संघटनेतील कामाचे रावसाहेब दानवे यांचे प्रगतीपुस्तक उत्तम शेऱ्याने भरलेले असल्यामुळे विधानसभेच्या आखाड्यात मैदान मारण्यासाठी भाजपने रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी संयोजक पदावर दानवे यांची नियुक्ती करत पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी टाकली आहे. पक्षाला यश मिळवून देण्याचा दानवे यांच्या कार्यकाळातील आलेख सतत उंचावलेला होता. तो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर पुन्हा उंचावण्याचे मोठे आव्हान दानवे यांच्यासमोर असणार आहे.

Raosaheb Danve News
Pune BJP News : विधानसभेसाठी भाजपने मोहोळ अन् मुंडेंकडे सोपवली पुण्याची जबाबदारी!

पक्षाने दिलेली जबाबदारी आनंदाने स्वीकारत रावसाहेब दानवे यांनी कामाला सुरवातही केली आहे. राज्यातील बुथवर भाजपचे नेटवर्क अत्यंत मजबूत आहे. पण ते सगळ्याच बुथवर व्हावे,असा माझा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचे काम मी करणार, असल्याचे दानवे सांगतात. लवकरच संपूर्ण राज्याचा दौरा करणार असून सरकारच्या लोकांसाठी असणाऱ्या योजना घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर असणार आहे, असे दानवे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महाविकास आघाडीसह, महायुतीतील मित्र पक्षांनी यात्रांवर जोर दिला आहे. भाजपचा असा काही विचार आहे का? यावर भाजपने अजून तरी अशी कुठली यात्रा काढण्याचे नियोजन केलेले नसल्याचे स्पष्ट केले. पण अशा यात्रेचा विचार झाला तर त्याचे नेतृत्व निश्चितच रावसाहेब दानवे यांच्याकडे असेल, असे बोलले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा `भला आदमी` म्हणजेच रावसाहेब दानवे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात सत्ता मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावतात का? यावर त्यांचे पुढील राजकीय भवितव्य ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com