Solapur News : ड्रग्ज तस्कार ललित पाटील याला मदत करणारे महाराष्ट्रातील मंत्री आहेत. तसेच, त्याच्या पैशाच्या ओझ्याखाली पोलिस खातं वाकलं होतं. पोलिस खात्यातील आजी माजी अधिकारी पाटील याच्या पैशाचे लाभार्थी आहेत. त्यामुळे ललित पाटील याचा एन्काउंटर होऊ शकतो, असे धक्कादायक विधान काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले. (Lalit Patil may be encounter; Ravindra Dhangekar)
आमदार रवींद्र धंगेकर हे आज (ता. २९ ऑक्टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर हेाते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ललित पाटील, ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर, मंत्री आणि पोलिस खात्यातील अधिकारी यांच्या संबंधावर भाष्य केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून पळून जाऊन ललित पाटील याला आता एक महिना पूर्ण होत आहे. ससून हॉस्पिटलचे डीन संजय ठाकूर यांनी त्याच्यावर तब्बल ९ महिने उपचार केले. त्याला ९ महिने पंचतारांकित सुविधा देण्यात आली. त्याचे दोन साथीदार अंमली पदार्थ विकताना सापडलेले असताना त्याला डीएसपी अमोल झेंडे यांनी अटक का केली नाही. त्यामुळे झेंडे यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही धंगेकर यांनी केली.
ते म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात येईल. मात्र, अजूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. डीएसपी झेंडे यांनी संबंधितांना अटक का केली नाही, याचा तपास झाला पाहिजे. या प्रकरणाचा तपास राज्य पाेलिसांकडून काढून तो केंद्रीय यंत्रणांकडे द्यावा.
सोलापुरात कोरोना काळात शेख नावाच्या माणसाबरोबर मिळून संजीव ठाकूर याने भ्रष्टाचाराचं कुरण केले होतं. त्यांच्यावर ३११ अन्वये कारवाई करण्यात यावी. संजीव ठाकूर आणि ललीत पाटील यांची नार्को टेस्ट व्हायला पाहिजे. संबंधितांना अटक झाली नाही, तर मी हायकोर्टात जाणार आहोत. येत्या काळात आम्ही पोलिस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्ताधारी मराठा समाजाची फसवणूक करत आहेत
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही आमदार धंगेकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी उपोषण करत आहेत. मराठा समाजाची पूर्वी जी परिस्थिती होती, ती आज नाही. पण, सत्ताधाऱ्यांकडून मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं जात आहे. सरकारने तातडीने निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे.
गुजरात दंगलीवेळी कारवाई केली असती तर हे जन्मलेच नसते
मला कोणी धमकी देऊ शकत नाही. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, तसं झालं तर लाखो लोक रस्त्यावर येतील. सत्ता ही कोणाच्या दाराची बटीक नाही. तपास यंत्रणा ही आज त्यांच्याकडे आहे, उद्या आमच्याकडे येईल. गुजरातची दंगल झाली, त्यावेळी कारवाई केली नाही. तेव्हा कारवाई केली असती, तर हे जन्मले नसते, असा टोला नाव न घेता धंगेकर यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.