Kul Vs Raut : आमदार राहुल कुल २०२४ मध्ये जेलमध्ये दिसतील; संजय राऊतांनी वर्तविले भाकित

Baramati Loksabha : शरद पवार देतील तोच उमेदवार बारामतीतून निवडून येईल.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

Daund News : दौंड तालुक्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यातील पाचशे कोटी रूपयांच्या मनी लॅांड्रिंग प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल हे २०२४ मध्ये जेलमध्ये असू शकतात, असे भाकित शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्तविले. (MLA Rahul Kul will be seen in jail in 2024; Sanjay Raut)

नगर जिल्ह्यातील काष्टी येथील कार्यक्रमासाठी आलेले संजय राऊत यांनी दौंडमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला. काही महिन्यांपूर्वी राऊत यांनीच आमदार राहुल कुल यांच्यावर पाचशे कोटी रुपयांच्या मनी लॉड्रिंगचा आरोप केला हेाता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Fadnavis On Jarange Patil : जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

राऊत यांनी याबाबतच्या कागदपत्रांचा दस्तऐवज ईडीच्या कार्यालयात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला होता. मात्र, या प्रकरणी राज्य सरकारने आमदार राहुल कुल यांना क्लिनचिट दिली आहे. त्यानंतर आज दौंडमध्ये आलेल्या राऊतांनी पुन्हा एकदा कुल यांच्यावर निशाणा साधला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत राऊत म्हणाले की भाजपकडे सक्षम उमेदवार नाही. नेहमीप्रमाणे भाजप एक तर उमेदवार आयात करेल किंवा लादला जाईल. शरद पवार देतील तोच उमेदवार बारामतीतून निवडून येईल. पवारांनी दिलेल्या उमेदवाराला मोठ्या मतांनी निवडून आणण्याची आमचीही जबाबदारी असणार आहे.

सिंचन गैरव्यवहाराचा आरोप केलेल्या अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेत उमुख्यमंत्री बनविण्यात आले. पण, सत्तेच्या विरोधात बोलणारे आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना मात्र अटक करण्यात आली. आम्ही चळवळीतून पुढे आलेलो आहे. त्यामुळे आम्ही कोणालाही शरण जाणार नाही. सिंह यांची अटक ही राजकीय दृष्टीने प्रेरित आहे. ओवाळून टाकलेल्या आणि भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपने जवळ केले आहे; परंतु सत्ता परिवर्तन अटळ आहे, असा अंदाजही राऊतांनी व्यक्त केला.

Sanjay Raut
Babanrao Shinde News : राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेंची जाहीर दिलगिरी; ‘ते विधान जरांगे पाटलांविषयी नव्हते’

मोदींना आव्हान

मुंबईसह राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भाजपने जिंकण्याची हिम्मत असेल तर घेतली पाहिजे. पण, भाजपकडे ती हिम्मत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई महापालिकेसाठी महिनाभर येऊन प्रचार करून निवडणूक जिंकून दाखवावी, असे चॅलेंजही राऊत यांनी दिले.

Sanjay Raut
Maratha Aggressive : कोल्हापुरात खासदार मंडलिक, आमदार पाटील यांच्या गाडीसमोर झोपले मराठा आंदोलक

मराठी जनता आपले नेतृत्व गुजरातकडे देणार नाही

जनतेमध्ये भाजपविषयी नाराजी आहे, त्यामुळे आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वेगळा निकाल लागणार आहे. राज्यातील अकरा कोटी जनता आपले नेतृत्व गुजरातकडे देणार नाही. महाराष्ट्रात मराठी झेंडाच फडकेल. सत्ताधारी राजकीयदृष्टया मर्द असतील तर त्यांनी निवडणुका घ्याव्यात, असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Daund News : 'चले जाव...चले जाव...संजय राऊत चले जाव...' ; दौंडमध्ये राऊतांविरोधात मराठा तरुणांची जोरदार घोषणाबाजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com