Zadani Land Case Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Zadani Land Case : झाडाणीप्रकरणी सुनावणीला वळवींच्या वकिलांची हजेरी; कागदपत्रे देण्यासाठी मुदत

Chandrakant Valvi : सह्याद्री वाचवा मोहिमेंतर्गत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सर्व मागण्या मान्य होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Umesh Bambare-Patil

Satara News : झाडाणी येथील 640 एकर जमीन खरेदीप्रकरणी गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह तिघांना आज सुनावणीस हजर राहण्याची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली होती. त्यानुसार वळवी यांचे वकील सुनावणीस उपस्थित राहिले.

मात्र, कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागून घेतल्याने याबाबतची सुनावणी 20 जूनला होणार आहे. दरम्यान, सह्याद्री वाचवा मोहिमेंतर्गत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सर्व मागण्या मान्य होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

झाडाणी येथील 640 एकर जमीन गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी एजंटाच्या सहकार्याने जमीन खरेदी केली आहे. तसेच या परिसरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी जिल्हाधिकाऱ्यांनी कमाल जमीन धारणेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जीएसटी आयुक्त वळवी यांच्यासह तिघांना आज म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या दालनात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पीयूष बोगीरवार यांच्या वतीने ॲड. धनावडे उपस्थित राहिले. तर मोरे यांच्या वतीने ॲड. अशोक जाधव, ॲड. त्रुनाल टोणपे, तर महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण उपस्थित होते.

या वेळी म्हणणे मांडण्यासाठी आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी अजून अवधी पाहिजे असल्याचे संबंधितांच्या वकिलांनी सांगितल्यानंतर याप्रकरणी पुढील सुनावणी 20 जूनला होणार आहे. दरम्यान, झाडाणीप्रकरणी जिल्हा प्रशासनाने अजून कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यासह विविध मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा सुशांत मोरे यांनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT